कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्ज कोण फेडणार ? याबाबत सविस्तर माहिती,RBI चा नियम काय आहे ?
कोणतीही गरज पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते.मनुष्याची मुख्य गरज असते अन्न, वस्त्र ,निवारा. याची तर गरज असते पण त्याबरोबर पैसाही खूप महत्त्वाचा आहे. काही वेळेस नैसर्गिक घटनांमुळे किंवा व्यावहारिक गोष्टीमुळे मनुष्य कर्जबाजारी होतो. कर्ज काढण्या वाचून कोणताही पर्याय राहत नाही. अशा वेळेस बँकेकडून कर्ज घेतले जाते. सध्या बँक ही प्रत्येक गोष्टीवर कर्ज देत आहे. त्यामध्ये होम लोन, शिक्षणासाठी कर्ज, शेत जमिनीवर कर्ज, या गोष्टींवर बँक कर्ज देते. तसेच दागिने गहाण ठेवून देखील कर्ज काढले जाते.
हे ही वाचा : राज्यातील शाळांमध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान
हे ही वाचा : राज्यातील शाळांमध्ये मिळणार उकडलेली अंडी !
हे ही वाचा : शेतकऱ्यांना मिळणार आता Kisan Credit Card
हे ही वाचा : Sim Card rules : 1 डिसेंबर पासून संबंधित नियमात बदल होणार
काहीजण आपल्या नावे कर्ज घेतात आणि काही कारणाने ते कर्ज योग्य वेळेत फेडू शकत नाहीत. अशावेळी बँक त्या व्यक्तीच्या मालमत्तेचा लिलाव करून कर्ज वसूल करते. यामध्ये कर्ज घेतलेल्या व्यक्ती जर जिवंत नसेल तर त्याबाबत RBI ने काही नियम लागू केले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया.
एखादा व्यक्ती कर्ज घेतो आणि अचानक काही कारणास्तव त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या व्यक्तीची थकबाकी कोण भरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्याबाबत अनेक नियम व कायदे बनवण्यात आले आहेत. त्याबद्दलचे खास नियम RBI ने असे कोणते बनवले नाहीत.कर्ज फेडण्यासाठी पहिल्यांदा त्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले होते याचा विचार होतो.कर्ज विविध विभागात विभागलेले असते.
RBI चा असा नियम आहे कि ज्या व्यक्तीने घरासाठी कर्ज घेतले आहे, त्या व्यक्तीचा काही कारणास्तव अचानक मृत्यू झाला तर ते लोन फेडण्यासाठी त्या व्यक्तीचा वारस जबाबदार असतो. जी व्यक्ती जबाबदार आहे त्या व्यक्तीने ही वेळेवर कर्ज फेडले नाही,तर बँक ज्या व्यक्तीने कर्ज घेतले होते त्याच्या मालमत्तेवर बँक लिलाव करून कर्ज वसूल करून घेते. त्या व्यक्तीने गृह कर्जाचा विमा उतरवला असेल तर विमा कंपनीकडून कर्जाची वसुली बँक विमा कंपनी च्या सहाय्याने करू शकते.जर मदत विमा घेतल्यास दाव्याची रक्कम नॉमिनीच्या खात्यात जमा केली जाते.
ही प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने केली जाते. त्यामुळे कायद्याने जो वारस आहे त्या व्यक्तीला शिल्लक असलेल्या रकमेतून पैसा देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. अनेक जण वैयक्तिक लोन, कार लोन, आणि क्रेडिट कार्ड लोन या प्रकारातील कर्ज घेतात.तर ते कर्ज फेडण्यासाठी RBI ने काही नियम लागू केले आहेत. बँक पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन या कर्जाला कोणतेही तारण नसते. त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते कर्ज वसूल करू शकत नाही. त्यामुळे बँकेला कायदेशीर वारस आणि कुटुंबातील सदस्य यांच्याकडून कर्ज वसूल करता येत नाही.
परंतु जो सह खरेदीदार आहे ती ही रक्कम फेडू शकतो. तेही शक्य न झाल्यास बँक NAP घोषित करते. कार साठी लोन घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर ते लोन फेडण्यासाठी बँक त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क करते. कुटुंबातील व्यक्ती कार ठेवणार असेल तर राहिलेली रक्कम फेडू शकत असेल तर कार त्या व्यक्तीकडेच ठेवली जाते आणि शिल्लक थकबाकी मिळवली जाते. जर त्या व्यक्तीने असे केले नाही तर कार जप्त करण्यात येते आणि त्या कार वर लिलाव करून कर्ज वसूल करून घेतले जाते. असा एक नियम RBIने बनवला आहे .जेणेकरून तो व्यक्ति मृत्यूनंतर ही तारण कर्ज फेडू शकेल याची पूर्ण काळजी RBI ने घेतली आहे.