इंजिनियरिंग मध्ये मराठी भाषा सक्तीची होणार ? याविषयी सविस्तर माहिती
आपणा सर्वांना माहित आहे की, इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंतच्या माध्यमातून मराठी भाषा अगोदरच सक्तीची करण्यात आली आहे. यामुळेच की काय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील इंजिनिअरिंग मध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यात यावी असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हे वृत्त आहे झी मीडिया नेटवर्कचे. Will Marathi be compulsory in engineering ?
वाशी येथे विश्व मराठी संमेलन 2024 भरवण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावरून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केलेली होती. विशेष म्हणजे या व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा : ध्रुवनगर मनपा शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रमासह उत्साहात साजरा.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी म्हणाले की, आम्ही कुठल्याही राजकारणी व्यक्तीला संमेलनासाठी बोलावलेले नाही मात्र आपण बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपला आहे त्यामुळे आम्ही आपल्याला या संमेलनासाठी बोलावलेले आहे. असे दीपक केसरकर राज ठाकरेंना उद्देशून बोलत होते. दीपक केसरकरांनी राज ठाकरे यांचे यावेळी कौतुक केले.
राज ठाकरे यांनी यावेळी व्यासपीठावरून आपले मनोगत व्यक्त केले. मी एक कडवा मराठी आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मी मराठी या विषयाशी संबंधित काम करत आहे. मी अनेक आंदोलने केली आहेत, अनेक केसेस माझ्या अंगावर आहेत. तुरुंगात सुद्धा गेलेलो आहे. तिकडे अमेरिकेत लोक मराठी शाळा काढत आहेत आणि महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत असे ते बोलत होते. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने मला जून महिन्यामध्ये तिकडे आमंत्रित केले आहे असे ते बोलत होते.
हे ही वाचा : मराठा आरक्षण : राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्रश्नावली नुसार महाराष्ट्रात सर्वेक्षण उद्यापासून
गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये मी अनेक वेळा मराठी वर बोललो आहे. त्यामुळे अनेक लोक माझ्या अंगावरती आलेले आहेत. मराठी माणूस जगभर पसरलेला आहे परंतु महाराष्ट्रात मराठी माणसाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून हिंदी भाषा कानावर पडत असते. हिंदीला विरोध नाही पण ती इतर भाषा प्रमाणे एक भाषा आहे असे वाटते.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की यावर्षीपासून आम्ही पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शक्तीची केली आहे. याला उत्तर देताना राज ठाकरे पुन्हा माईक जवळ आले आणि म्हणाले त्यासाठी शिक्षक ही चांगले नेमा असे ते बोलले.