नाशिक जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण पूर्वतयारीबाबत महत्त्वाचे आवाहन.
भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लवकरच देशभरात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पूर्वतयारी म्हणून महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
Table of Contents
पूर्वतयारी अंतर्गत करण्यात येणारी कार्यवाही
सदर मोहिमेत खालीलप्रमाणे माहिती संकलन व पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे:
1.मतदार नाव मॅपिंग प्रक्रिया
ज्या मतदारांचे नाव सन 2024 च्या मतदार यादीत आहे, त्यांचे नाव सन 2002 च्या मतदार यादीशी मॅप करण्यात येईल. ज्या मतदारांचे नाव 2024 मध्ये आहे, पण 2002 मध्ये नाही, अशा मतदारांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्या नावांची 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग केली जाईल.
2.गृहभेटीद्वारे माहिती संकलन
ज्या मतदारांचे किंवा त्यांच्या पूर्वजांचे नाव 2002 यादीमध्ये आढळले नाही तर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी B.L.O प्रत्यक्ष तुम्हाला भेट देऊन तुमच्याकडून माहिती मिळवतील.
मतदाराच्या मूळ राहत्या ठिकाणी माहिती घेतली जाईल जसे की राज्य, जिल्हा, तालुका, गाव.
हे ही वाचा: महाराष्ट्रातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी सह सरकारची महत्त्वाची घोषणा.
3.विवाहानंतर स्थलांतरित महिलांची माहिती
ज्या महिलांचे विवाहानंतर नाव सध्याच्या मतदार यादीत समाविष्ट आहे. त्यांच्या आई-वडिलांचे नाव 2002 मध्ये कोणत्या मतदारसंघात होते याची माहिती घेतली जाईल.
4.ऑनलाइन मॅपिंग प्रक्रिया
सर्व माहिती संकलनानंतर voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संबंधित मतदाराचे 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे (जर मागणी झाली तर)
या सर्व प्रक्रियेमध्ये पडताळणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असेल (जर मागणी केली तर)
- आधार कार्ड / ओळखपत्र
- रहिवासी पुरावा (वीज बिल, रेशन कार्ड इ.)
- जन्मतारीख संबंधित पुरावा
- कुटुंबातील सदस्यांची माहिती
महत्त्वाच्या सूचना
- चुकीची माहिती दिल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता असते.
- B.L.O. अधिकारी आले तर सहकार्य करणे आवश्यक आहे.
- वेळेत पडताळणी न केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
हे ही वाचा: हिरवीगार परसबाग: ध्रुवनगरच्या मनपा शाळेने फुलवली
या मोहिमेचे अनेक उद्दिष्ट आहेत त्यातले पुढीलपैकी:
- मतदार यादी मध्ये अचूकता असायला हवी.
- मतदार यादी मधून डुबलीकेट नावे वगळणे.
- पात्र नागरिकांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे.
- निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता मजबूत करणे.
मतदार यादीमध्ये विशेष पडताळणी करण्यासाठी दिवस
नागरिकांना जर त्यांच्या नावाची मॅपिंग स्थिती तपास जायची असेल तर त्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
दिनांक: शनिवार, 4 एप्रिल 2026
वेळ: सकाळी 9:00 ते दुपारी 2:00
स्थळ: नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे
या दिवशी संबंधित B.L.O. अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहतील आणि नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व माहिती देतील.
नागरिकांसाठी आवाहन
नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारांना नम्र विनंती आहे की, आपल्या मतदार यादीतील नावाचे 2002 च्या यादीशी मॅपिंग झाले आहे की नाही याची खात्री करावी यासाठी स्वतः मतदान केंद्रावर जाऊन B.L.O. शी संपर्क साधावा आवश्यक असल्यास कुटुंबीयांची माहिती सोबत आणावी
हे ही वाचा: नाशिक जिल्ह्यातील दुधाचा धबधबा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ !
प्रशासनाला सहकार्य करा
हा उपक्रम भविष्यातील मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.






