वाषाण जिल्हा परिषद शाळेत डफळापूर केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न याबाबत सविस्तर माहिती.
जत : प्रत्येक महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग नवनवीन शासन निर्णय,धोरणे,माहिती,योजना आणत असते.याची संपुर्ण माहिती शालेय पातळीवर होणे गरजेचे असते,त्याचबरोबर शिक्षणातील नवप्रवाह समजून घेऊन आपल्या केंद्रातील व शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी आपापसातील संवाद वाढवून शाळा समृद्ध करण्यासाठी सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षण परिषद आयोजित करण्यात येत असते. Vashan Zilla Parishad School, Daflapur Center’s Education Council concluded with enthusiasm.
हे वाचा
जत तालुक्यातील वाषाण येथील जिल्हा परिषद शाळेत डफळापूर केंद्राची शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी गटशिक्षणाधिकारी अन्सार शेख व विस्ताराधिकारी गवारी तसेच केंद्रप्रमुख आर. एम. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय काटेकोर नियोजनात शिक्षकांचे विविध शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन झाले.
यावेळी डफळे हायस्कूलच्या उपशिक्षिका चव्हाण, खलाटी शाळेचे उपशिक्षक बाबासो जानकर,कोळीवस्ती शाळेचे उपशिक्षक राठोड यांनी विविध शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या बौद्धिक स्पर्धेत डफळापुर नंबर 1 व मिरवाड शाळेने जिल्हास्तरीय मिळवलेल्या यशाबद्दल तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राठोड व पठाण यांचा ही सत्कार वाषाण गावच्या सरपंच छाया प्रकाश पाटील यांच्यामार्फत करण्यात आला.
वाषाण ही दुष्काळी जत तालुक्यातील शाळा असून सुद्धा अतिशय स्वच्छ, सुंदर बगीचा,वृक्षाने सजलेला आजूबाजूचा परिसर ,शिक्षक व गावकरी यांच्या प्रयत्नातून एक आदर्श शाळा बनवली आहे .या शाळेतील मुख्याध्यापक किशोर पाटील ,उपशिक्षक सिद्राम जाधव व प्रवीण साळे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थी विविध क्रिडास्पर्धा व गुणवत्ता चाचणी,स्पर्धा परीक्षा यामध्ये जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत चमकत आहेत.
हे ही वाचा
Home Loan वर मिळणा-या सबसिडीचा मिळणार 25 लाख लोकांना फायदा
वाषाण शाळा परिसर, परसबाग ,वृक्ष संवर्धन ,रेन हार्वेस्टिंग कचरा व्यवस्थापन यांचे उत्तम प्रकारे नियोजन व व्यवस्थापन करीत आहे. सर्व शिक्षक बांधवाकडून शाळेचे विशेष कौतुक करण्यात आले . केंद्रातील सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच छाया प्रकाश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बिरू पाटील ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पाटील ,उपसरपंच विष्णू शेळके ,युवानेते प्रकाश पाटील, ग्रा. स. बाबासाहेब शिरगिरे,सारिका धनाजी शेळके ,शिक्षण प्रेमी विजय चौगुले ,तंटामुक्ती अध्यक्ष गणपती गडदे,डफळापूर शाळा नं.1 मुख्याध्यापिका तांबोळी, पालक भूपाल पाटील आदी उपस्थित होते.
हे ही वाचा
रस्ता सुरक्षेबाबत समाजप्रबोधन : मनपा शाळा क्र. 49 पंचक शाळेचा कौतुकास्पद उपक्रम !
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्या.किशोर पाटील यांनी केले तर शिक्षण विस्तार अधिकारी के. पी .पाटील, केंद्रप्रमुख रतन जगताप यांनी विशेष मार्गदर्शन केले .मकानदार,राठोड यांनी शाळेबद्दल गौरवोद्गार काढले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्जुन माने (पोलीस पाटील वाषाण) शकुंतला पाटील, लिंबाजी शेळके ,सीमा गडदे ,वंदना गडदे, जाधव ,साळे यांनी विशेष कष्ट घेतले.तर कार्यक्रमाचे आभार वरिष्ठ मुख्या.अरविंद बंडगर यांनी व्यक्त केले.