30 मिनिटात 1 हेक्टर जमीन मोजणी आता शक्य होणार! याबाबत माहिती.
30 मिनिटात 1 हेक्टर जमीन मोजणी आता शक्य होणार आहे.याबाबत सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत. राज्यातील जमिनीची मोजणी किंवा लॅंड सर्वेक्षण ही पूर्वीच्या काळी एक किचकट प्रक्रिया होती.राज्यात यापूर्वी प्लेन टेबलने जमीन मोजणी करण्यात येत होती .आज टेक्नॉलॉजीच्या म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे .प्रत्येक कार्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे . 1 hectare land calculation is now possible in 30 minutes !
हे ही वाचा
“कौन बनेगा अभ्यासपती” अनोखा उपक्रम पाथर्डीगांव मधील मनपा शाळा क्र.86 मध्ये संपन्न !
नवनवीन यंत्रे तंत्रे ही विकसित होत आहेत. आजकालच्या युगात पहावे तिकडे भावा भावांच्या, बहिण भावामध्येही जमिनीवरून वाद होतच आहेत. हे वाद मिटवण्यासाठी नवीन मशीनची निर्मिती करण्यात आली आहे .हे असे एक यंत्र आहे ज्यामुळे वेळेचे आणि इंधनाची या दोन्ही गोष्टींची बचत शक्य होणारआहे.आपल्याला विश्वस्त आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी हे वाचणे खूप गरजेचे आहे.
या नवीन तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्र शासनाचा जो भूमी अभिलेख विभाग आहे, त्यांच्याकडून आता रोवर मशीन चा वापर करून जमिनीची मोजणी केली जाणार आहे .या तंत्रज्ञानामुळे एक हेक्टर जमिनीची मोजणी 30 मिनिटात शक्य होते असा दावा भूमी अभिलेख विभागाने ही केला आहे. या यंत्राविषयी सविस्तर माहिती पाहूया.
Table of Contents
रोवर मशीन काय आहे ?
जमीन मोजणीसाठी जी रोवर मशीन तयार केली गेली आहे, ती घेऊन मोजणीसाठी सहज कुठे ही घेऊन जाणे शक्य होणार आहे. पूर्वीच्या काळी रोवर मशीन ऐवजी जमीन मोजणीसाठी प्लेन टेबल किंवा इ. टी. एस. मशीनचा वापर केला जायचा पण, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोवर मशीनची निर्मिती त्यासाठी करण्यात आली आहे.
हे ही वाचा
एक हेक्टर जमीन मोजणी 30 मिनिटात करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रात 77 ठिकाणी CORS स्थापन केलेले आहेत.CORS चा संपर्क थेट उपग्रहांशी असतो. रोवर मशीन सुद्धा एक हालती चालती वस्तू आहे ,ज्याला आपण थेट शेतात घेऊन जाऊ शकतो .रोव्हर मशीन ही उपगृहाशी जोडली गेली आहे.त्यामुळे हे रोवर अतिशय अचूक माप दर्शवते.
शेतकरी वहिवाटीच्या खुणा जशा दाखवेल त्यांच्यासोबत चालत चालत त्या ठिकाणांचे रीडिंग घेणे जेवढी जमीन आहे,तेवढी जमीन फिरायला वेळ लागतो तेवढ्या वेळात ही मशीन जमीन मोजते.ही मशीन कुठेही घेऊन गेलो तरी ते कोणत्याही स्थानाची अचूकता दर्शवते. पूर्वीच्या काळी प्लेन टेबल किंवा ई टी एस ने जमीन मोजणी व्हायची त्यावेळी जास्त वेळ लागायचा पण,रोवर मशीन मुळे जमीन मोजणे लवकर आणि सोपे होणार आहे.
हे ही वाचा
नाशिक महानगरपालिके मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची थोडक्यात माहिती.
जेंव्हा जमीन मोजणीच्या क्षेत्रात फिरून पूर्ण होते, तोपर्यंत रोवर द्वारे मोजणी पूर्ण होते.पूर्वीच्या काळी उंच गवत किंवा एखादे झुडुप असेल तर मोजणी होऊ शकत नव्हती किंवा एखादे मोठे झाड आडवे येत असेल तर त्याच्या फांद्या तोडाव्या लागायच्या इ.टी.एस. मशीन हे साडेचार फुटावर लावतात. जर साडे चार फुटा पेक्षा जास्त उंचीचे झाड असेल तर त्या ठिकाणी अडथळा येतो.
मशीन ने मोजणी करताना परिसर मोकळा असेल किंवा नसेल तरीही निरीक्षणे घेऊ शकतो. रोव्हर मशीनची मोजणी तात्काळ होते.अगदी पाच सेंटिमीटर च्या जागेची ही अचूकतेची नोंदणीही करता येते. टेबल प्रक्रिया करताना प्रत्येक 200 मीटर वर टेबल लावावा लागायचा. उंच झाडामुळे निरीक्षण घेता यायचे नाहीत. 1 hectare land calculation is now possible in 30 minutes!
उंच सखल भागाचा अडथळा यायचा.जमीन मोजणीसाठी सर्वसाधारणपणे अर्धा किंवा एक दिवस लागायचा पण, आता ते दिवस इतिहास जमा होणार आहेत.एक किलोमीटर चे क्षेत्रफळ जर असेल तर फक्त दोनच तासात मोजणी पूर्ण होणार असल्याचे समजते.
हेही वाचा
“कौन बनेगा अभ्यासपती” अनोखा उपक्रम पाथर्डीगांव मधील मनपा शाळा क्र.86 मध्ये संपन्न !
रोवर मशीननं जमीन मोजण्याची पद्धत किती बरोबर आहे ?
सर्वसाधारणपणे भूमी अभिलेखाची मोजणीची जी परमिशेबल लिमिट असते,ती ग्रामीण भागासाठी 25 सेंटिमीटर आणि शहरी भागात साडेबारा सेंटीमीटर असते .त्यांच्या आत मधली अचूकता मिळत असल्यामुळे रोवरमुळे मोजणी कामाला खूप महत्व आलेले आहे. रोवर मशीनची अचूकता ही पाच सेंटिमीटर च्या आत मध्ये आहे.अनेक जिल्ह्यात रोव्हर चा वापर करून जमीन मोजली आहे.
फायदे
हे ही वाचा
भूकंप झाला,पूर आला,दगड खुला वाहून गेला ,तरी अक्षांश रेखांश असल्यामुळे पूर्वीच्या हद्दी या साहाय्याने दिसू शकणार आहेत. या पद्धतीने मोजणी करून घेतली तर समोरचा किती बांध कोरला हे लक्षात येईल आणि अतिक्रमणाला आळा बसेल.अतिक्रमण करताना लोक बांध कोरतात.त्यामुळे जमीन समोरच्याचीच असल्याचा भास होतो.रोवर वापरून जी मोजणी केली जाते, त्याचे अक्षांश रेखांश मिळतात .रोवरद्वारे होणारी जमिनीची मोजणी ही तंतोतंत आहे. तसेच आत्ता राज्यातील कोणतीही मोजणी रोवर च्या सहाय्याने करता येणार आहे.या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा सर्वांनी घायला हवा.आज गावा गावात,भावाभावात जमिनीवरून वाद आहेत त्यावर एक उत्तम रामबाण उपाय आला आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.