“कौन बनेगा अभ्यासपती” अनोखा उपक्रम पाथर्डीगांव मधील मनपा शाळा क्र.86 मध्ये संपन्न !

“कौन बनेगा अभ्यासपती” हा अनोखा उपक्रम नाशिक च्या पाथर्डीगांव मधील मुलींच्या मनपा शाळा क्र.86 मध्ये आयोजित करण्यात आला होता.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची शाळा मनपा शाळा क्र.86 ( मुली ),पाथर्डीगांव ही एक उपक्रमशील व गुणवत्तेची उज्वल परंपरा लाभलेली शाळा आहे.

शाळेत विविध अभ्यासपूरक, सामाजिक आणि इतर उपक्रम नेहमी आयोजित करण्यात येत असतात. अलीकडेच मनपा शिक्षण विभागाकडून “दप्तरमुक्त शनिवार” हा उपक्रम प्रत्येक शनिवारी मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी मा.बी टी.पाटील यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील मनपा शाळेत आयोजित करण्यात येत असतो.

हे ही वाचा

नाशिक महानगरपालिके मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची थोडक्यात माहिती.

त्या अंतर्गत नाशिक मधील शिक्षण विभागाच्या ९० शाळांमध्ये हा उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यात येत असतो.सदर दिवशी मुलांचा दप्तराशी कोणताही संबंध न येऊ देता त्यांना खेळ,कृती,श्रवण याद्वारे गुंतवून ठेऊन याद्वारे त्यांचे अध्ययन अपेक्षित आहे.असे आणि यावर आधारित कृती नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळेत घेण्यात येत असतात.

मनपा शाळा क्र.86 ( मुली ) , पाथर्डीगांव येथे “दप्तरमुक्त शनिवार” उपक्रमांतर्गत “कौन बनेगा अभ्यासपती” (I am always ready) हा उपक्रम कशा प्रकारे संपन्न झाला याबाबत आता आपण माहिती घेऊ या.

 काल शनिवार दि.02/09/2023 रोजी मनपा शाळा क्र.86 ( मुली ) , पाथर्डीगांव येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत “कौन बनेगा अभ्यासपती” (I am always ready) हा उपक्रम घेण्यात आला .

हे ही वाचा

गिरलिंग मंदिर, जुना पन्हाळा कुकटोळी. महाराष्ट्राला या ठिकाणाबद्दल माहिती आहे का ? Girling Temple, Old Panhala Kuktoli. Does Maharashtra know about this place?

"कौन बनेगा अभ्यासपती"
नाशिकच्या पाथर्डीगांव मधील मनपा शाळा क्र.86 मध्ये “कौन बनेगा अभ्यासपती” हा अनोखा उपक्रम

कौन बनेगा अभ्यासपती ( I am always ready ) या उपक्रमाची विद्यार्थिनींना 2 दिवस आधी कल्पना देऊन त्यात समानार्थी शब्द , पाढे पाठांतर , विरुद्धार्थी शब्द आणि दैनंदिन जनरल नॉलेज प्रश्न यांची तयारी करण्यास सांगण्यात आले होते.

प्रत्यक्ष या स्पर्धेत अंतिम विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थिनीला वही , 2 पेन , पेन्सिल , खोडरबर व शार्पनर याचा 1 सेट मिळनार आहे असे घोषित करण्यात आले होते व ते त्यांना मिळाले.. काल वर्गात विशिष्ट रचना करून हा उपक्रम घेण्यात आला. प्रथम पात्रता फेरी मध्ये 6 विद्यार्थिनींची निवड करण्यात येऊन त्यानंतर कालमर्यादित प्रश्ना त 6 मधून 1 विद्यार्थिनी प्रत्यक्ष स्पर्धेत निवड करण्यात आली.

हे ही वाचा

मोकळ्या जागेपासून पैसे कसे मिळवू शकाल |यातील एक तरी पर्याय लागू पडेल.how you can earn money from open space

त्यानंतर क्रमवार प्रश्नाला 1-1 शैक्षणिक वस्तू वाढत जाऊन शेवटी 10 व्या प्रश्नाला संपूर्ण सेट अंतिम विजेत्याला बक्षीस म्हणून देण्यात आले. मात्र मध्येच छोटे बक्षीस मिळवून खेळ सोडता येत होता. पुढे उत्तराबरोबर खेळ पुढे जात होता, पण एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले तर प्रथम बक्षिस पेन्सिल त्या विद्यार्थिनीला मिळत होती.

या संपूर्ण खेळात विद्यार्थिनीला दोन जीवनदायिनी वापरता येत होत्या १) मित्राची मदत २) पर्याय देणे. यांची मदत घेऊन विद्यार्थिनी खेळ पुढे वाढवत होत्या. अशाप्रकारे संपूर्ण खेळात काल 5 विद्यार्थीनी विजेत्या ठरल्या.

हेही वाचा

Std 5th and Std 8th शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज या तारखेपासून सुरु

                       सदर उपक्रमात इ. 5 वी च्या विद्यार्थिनी सहभाही झाल्या. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलास दांडगे व उपमुख्याध्यापक श्री.पद्माकर बागड,वर्गशिक्षक श्री.राम तळपे आणि शैला बोरसे यांनी आयोजन केले तर उर्वरित शिक्षकवृंदांनी विद्यार्थिनींना उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले व सहभागी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.

उपक्रमाचे फायदे :

1) विद्यार्थिनींमध्ये वाचन प्रेरणा जागृती  होते.
2) विद्यार्थिनीना अभ्यास केला तरच आपण स्पर्धेत टिकू याची जाणीव निर्माण झाली .
3 ) स्वतःच तयारी करावी आणि मैत्रिणीशी संबंध चांगले असावे याचीही जाणीव झाली.
4) स्पर्धेत मदत द्यायची व घ्यायची यामुळे सहकार्य वृत्ती वाढीस लागते.
5) विद्यार्थिनींमध्ये अवांतर वाचनाची सवय निर्माण होते.

हे ही वाचा

नाशिक महानगरपालिका शाळांतील मुलांना लवकरच मिळणार स्काऊट व गाईड विषयांना अनुरूप दुस-या टप्प्यातील गणवेश : शिक्षण विभागाकडून मिळालेल्या  मार्गदर्शक सूचना काय आहेत पहा.

महत्वाचे- विद्यार्थिनी खेळात एवढ्या रममाण झाल्या की जेवणाची सुट्टी देखील फक्त 10 मिनिटांची घेऊन लगेच खेळ पुढे सुरू करण्याची विनंती केली होती.अशा प्रकारे विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्याची किती गरज आहे याची जाणीव करून दिली.इतर ही फायदे या उपक्रमाचे आहेत ते आताच वर बघितले.

या शाळेतील सर्व शिक्षक अतिशय चांगले काम करतात.मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभते आणि ते स्वत: सहभाग घेत असतात.

Leave a Comment