पी एम स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना बँकेमार्फत प्रथम 10 हजार रुपये

पी एम स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना बँकेमार्फत प्रथम 10 हजार रुपये

नाशिक महानगरपालिकेमध्ये शहरी फेरीवाल्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (पीएम स्वनिधी) सुरु आहे. या योजने अंतर्गत अद्याप पर्यंत प्रथम १० हजाराचे कर्ज बँकेमार्फत २०८८० पथविक्रेत्यांना रक्कम रुपये २० कोटी ८२ लाख रुपयेचे वितरण करण्यात आले आहे.

दुसरा टप्प्यातील २० हजाराचे ५९१८ पथविक्रेत्यांना र.रु. ११ कोटी ८३ लाख आणि तिसरा टप्प्यात ३९४ पथविक्रेत्यांना र.रु. १ कोटी ९७ लाख असे एकूण २७१९२ पथविक्रेत्यांना र.रु. ३४ कोटी ६२ लाख रुपये वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा : सार्वजनिक गणेश उत्सव 2023 | Public Ganesh Utsav 2023 बाबत नाशिक मनपाची महत्वाची अपडेट !

पीएम स्वनिधी योजनेतर्गत
पी एम स्वनिधी योजनेंतर्गत

हेही वाचा : नाशिक महानगरपालिकेत भरती : पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी.

नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात व्यवसाय करत असलेले व ज्यांनी अद्याप पर्यंत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ न घेतलेले असे सर्व पथविक्रते (छोटे व्यवसाय करणारे सर्व) यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. पीएम स्वनिधी योजनेचे ऑनलाईन फॉर्म आपण राहत असलेल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्र किंवा मनपा विभागीय कार्यालय येथे जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून बँकेत सादर करावा.

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र

आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक, पॅनकार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, बाजार फि वसुली पावती (असेल तर) आणि फोनपे / गुगलपे/पेटीएम यांचा UPI ID सोबत घेऊन जावे.

तसेच पीएम स्वनिधी योजनेतर्गत १० हजाराचे कर्ज मिळलेल्या सर्व पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाने ‘स्वनिधी से समृद्धी’ अभियान सुरु केले आहे. यामध्ये ज्या पथविक्रेत्यांनी अद्याप पर्यंत


१) पीएम मातृ वंदना योजना
२) जननी सुरक्षा योजना
३) पीएम सुरक्षा बिमा योजना
४) पीएम जीवन ज्योती बिमा योजना
५) पीएम जन धन योजना
६) एम श्रम योगी मानधन योजना
७) वन नेशन वन राशन कार्ड
८) इमारत व इतर बांधकाम कामगार या आठ योजनेचा लाभ घेतला नाही त्यांनी आपल्या जवळ असलेल्या नाशिक मनपा

शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी शासनाच्या पीएम स्वनिधी व समृध्दी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच ज्यांनी कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांनी आवश्यक त्या सर्व दस्तऐवजासह बँकेशी संपर्क करून कर्ज प्राप्त करून घ्यावे व कर्जाचे हप्ते वेळेवर भरावे.

ज्यांचे कर्जाचे हप्ते थकबाकीत आहे त्यांना एकत्रित थकीत रक्कम भरून पुढील टप्प्याचे कर्ज उपलब्ध करून घ्यावे. पीएम स्वनिधी योजनेबाबत काही अडचण आल्यास जवळच्या मनपा विभागीय कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन मा. आयुक्त सो.. नाशिक महानगरपालिका यांचेकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment