नाशिक महानगरपालिकेत भरती : पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी.

नाशिक महानगरपालिकेत भरती पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक जागासाठी : भरती प्रक्रियेबाबत महत्वाची माहिती खालीलप्रमाणे

नाशिक महानगरपालिका पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक व पशुधन विकास अधिकारी पदे मानधन पद्धतीने भरण्यासाठी अर्ज उमेदवारांकडून मागवण्यात येत आहेत.सर्व संबंधित उमेदवारांची सेवानिवृत्ती झालेला दाखला ,शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रासह जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून जाहिरातीमध्ये विहित नमुन्यातील असलेला अर्ज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे, तरी विहीत नमुन्यातील अर्जाप्रमाणे सादर करण्यात यावा.

हे ही वाचा

सार्वजनिक गणेश उत्सव 2023 | Public Ganesh Utsav 2023 बाबत नाशिक मनपाची महत्वाची अपडेट

अर्ज कार्यालयीन सुट्टी व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येत आहे.Nashik Municipal Corporation Recruitment Process for Livestock Development Officer and Livestock Supervisor Posts.

तरी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक 26/ 9/ 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, परंतु अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम वेळेबाबत स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करण्याचा अधिकार निवड समितीला आहे

मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करून त्या उमेदवाराची यादी मुलाखतीसाठी मनपाचे नोटीस बोर्डावर तसेच मनपाच्या www.nmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

हे ही वाचा

शाहरुख खानच्या’ जवान ‘ची 7 दिवसात Box office वरील कमाईचे आकडे !

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण व वेळ :-

पशुसंवर्धन विभाग ,तळमजला मनपा, मनपा मुख्यालय. राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक. 10 ते 5.

अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी www.nmc.gov.in या संकेत स्थळावर तसेच मुख्य मुख्य प्रवेशद्वारा जवळील नोटीस बोर्ड मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक येथे लावण्यात येत आहे.

मुलाखतीस पात्र उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही.

नाशिक महानगरपालिकेत भरती

हे ही वाचा

निपाह व्हायरस ची दहशत : निपाह संपुर्ण माहिती.देशात अलर्ट

अटी व शर्ती:-

पशुसंवर्धन विभाग मनपा नाशिक अंतर्गत भरण्यात येणाऱ्या सर्व पशुधन पर्यवेक्ष व पशुधन अधिकारी ची निवड मुलाखत ( 50 मार्क्स) पद्धतीने करण्यात येत आहे.

सदरील पदांचा मनपा नाशिक महानगरपालिका आस्थापनेशी कोणताही प्रकारचा संबंध राहणार नाही

सदरची पदे हे निव्वळ मानधनावर भरावयाचे आहेत . सुरुवातीस निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कामाचे आदेश दिले जातील.

मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मूळ निवृत्ती झालेला दाखला/ पत्रासह उपस्थित रहावे.

अर्ज छाननी अंती पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येत आहे.

अर्हता पात्र उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा दावा आणल्यास त्यांना मुलाखतीत व नियुक्तीस अपात्र ठरविले जाईल.

नियुक्ती बाबतचा अंतिम अधिकार आयुक्त तथा प्रशासक, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी राखून ठेवला आहे.

संपुर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment