शाहू विचारांचा जागर या अंतर्गत छ. शाहू महाराजांचे जीवनकार्यावर शालेय ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा आयोजित या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कर्तृत्व संपन्न कारकीर्द ही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व ठरली आहे. सुख विलासाची सर्व साधने पायी घोटाळत असताना कोल्हापूर संस्थानाच्या शाहू महाराजांनी उपभोगशून्य स्वामित्त्व गाजविले. सत्तेचे साधन हाती ठेवून प्रजेचा उत्कर्ष घडविण्यासाठी त्यांनी महत् प्रयास केले. जनतेच्या सर्वांगीण उन्नत्तीचे त्यांनी स्वप्न पाहिले व ते साकार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांनां ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाची उन्नती करावी, यासाठी सारथी उपकेंद्र व विभागीय कार्यालयामार्फत माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी शाहू विचारांचा जागर या अंतर्गत राजर्षी शाहू महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येत आहे.
सारथी संस्थेमार्फत मनपा नाशिक कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमांच्या माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सदर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. इ. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.
हे ही वाचा: NCMC smart card: प्रवाशांसाठी सवलतच सवलत !
अ. जिल्हास्तरीय निबंधस्पर्धा विषय व शब्दमर्यादाः
गट- 1. इ. 5 वी ते इ. 7 वी शब्द मर्यादाः 300 शब्द
गट- 2. इ. 8 वी ते इ.10 वी शब्द मर्यादाः 500 शब्द
विषयः शाहू विचारांचा जागर या अंतर्गत छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य
ब. जिल्हास्तरीय निबंधस्पर्धा नियम व अटी:
- शाहू विचारांचा जागर या अंतर्गत छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्यावर निबंध स्पर्धा 2026 चे आयोजन दि. 15 जून ते 21 जून 2026 या कालावधीत शाळा स्तरावर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी करावे.
- दि. 22 जून ते 25 जून 2026 या कालावधीत सर्व पर्यवेक्षक यांनी शाळास्तरावर संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेतील 1 ते 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा केंद्रस्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.
- छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना निबंधस्पर्धेत सहभागी घ्यावे.
- छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्यावर निबंधस्पर्धा 2026 ही स्पर्धा सर्व माध्यमाच्या, सर्व मान्यताप्राप्त शाळांतील विद्याथ्यांसाठी आयोजित केली आहे.
- निबंध लेखन स्पर्धाचे माध्यम मराठी असेल.
- विद्यार्थ्यांनी आपल्या इयत्तानिहाय गटातून एकाच विषयावर स्वतः निबंध लिहावा. निबंधावर विद्यार्थ्याने स्वतःचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव व निबंधाचा विषय नमूद करावा. तसेच निबंधाच्या शेवटी शब्द संख्या नमूद करावी.
हे ही वाचा: सेतू अभ्यास: इ.3 री, 4 थी व 6 वी साठी सविस्तर माहिती व अंमलबजावणी

- निबंध स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक प्राप्त करणाऱ्या 1 ते 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र दिले जाईल. योजना कार्यालयामार्फत शाळा स्तरापर्यंत प्रशस्तीपत्राचे वितरण विभागीय कार्यालयामार्फत करण्यात येईल.
- जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा पारितोषिक संख्येचा तपशिल पुढीलप्रमाणेः
- वितरीत करणेत येणाऱ्या प्रशस्तीपत्रकांची संख्या गट-1 (इ. 5 वी ते इ. 7वी)
- वितरीत करणेत येणाऱ्या प्रशस्तीपत्रकांची संख्या गट-2 (इ. 8 वी ते इ. 10 वी)
- मनपा कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सदर निबंध स्पर्धसाठी सक्रीय सहभाग घ्यावा यासाठी सर्व प्राथमिक/माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक यांनी स्पर्धेची माहिती द्यावी. राजर्षी शाहू विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शाळांनी (इ.5वी ते इ.10 वी) सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.
- त्यानुषंगाने सर्व मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेत स्पर्धा झाल्यावर खालील प्रमाणे अहवाल आपल्या केंद्र शाळेत सादर करण्यात यावा. जेणे करुन पर्यवेक्षक यांना केंद्र पातळीवर स्पर्धा आयोजित करता येईल.
- सर्व पर्यवेक्षक यांनी केंद्र पातळीवर स्पर्धा घेतल्यावर प्रपत्र अ, ब व गट निहाय प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक्राचे निंबध मनपा शिक्षण विभाग नाशिक येथे दि. 29.06.2026 पर्यंत सादर करावा.






