MY Bharat पोर्टलवर आयोजित केल्या जाणा-या विविध स्पर्धा / उपक्रमांचे प्रचार

स्वातंत्र्य दिन सोहळा २०२६ दरम्यान My Gov आणि MY Bharat पोर्टलवर आयोजित केल्या जाणा-या विविध स्पर्धा / उपक्रमांचे प्रचार व प्रसाराबाबत सविस्तर माहिती

केंद्रशासनाच्या पत्रात नमूद संरक्षण मंत्रालय MyGov आणि MyBharat यांच्या संयुक्त विद्यमाने परिशिष्ट अ नुसार आगामी स्वातंत्र्य दिन सोहळा २०२६ पासून विविध ऑनलाईन स्पर्धा/उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धा/उपक्रमांची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नियम व अटी देखील सोबत नोडल्या आहेत. या स्पर्धा/उपक्रमांची माहिती आपल्या सर्व शाळांमध्ये प्रसारित करण्यासाठी व्यापक प्रसिध्दी देण्यात येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त सहभागास प्रोत्साहन मिळेल आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढेल (सोबत संदभॉय केंद्र शासनाच्या पत्राची प्रत जोडली आहे.)MY Bharat

हे ही वाचा: Swiftchat: राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे हजेरी ऑनलाईन घेण्याचा आदेश

विविध स्पर्धा / उपक्रम व त्यांचे विषयः-

निबंध स्पर्धा

दिनांक ०१ जून २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत AI ची भूमिका या विषयावर आयोजित केलेली आहे.

ठळक वैशिष्ट्ये त्याचे सार दर्शवणारा ५००-६०० शब्दांतील निबंध लिहायचा आहे. अंतिम यादीतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी १५,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. सर्वोत्कृष्ट २०० सहभागींना (त्यांच्यासोबत एक वडील/आई/पालक) दिनांक १५ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणा-या स्वातंत्र्यदिन सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी ई-निमंत्रण पाठवले जाईल.

चित्रकला स्पर्धा

दिनांक ०१ जून २०२६ ते १५जुलै २०२६ या कालावधीत भारतः १९४७ ते भारत २०४७ या विषयावर आयोजित केलेली आहे.

हे ही वाचा: गॅस बुकिंग कंपन्यांनी या सुविधा केल्या उपलब्ध ! जाणून घ्या

ठळक वैशिष्ट्ये

अंतिम यादीतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी १५,०००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. प्रत्येकी ५००० रुपयांची २० उत्तेजनार्थ बक्षिसे. सर्वोत्कृष्ट २०० सहभागीना (त्यांच्यासोबत एक वडील/आई/पालक) दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी नव्वी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणा-या स्वातंत्र्यदिन सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी ई-निमंत्रण पाठवले जाईल.

ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा दिनांक ०१ जून २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत

१. भारतीय संविधान – मूलभूत हक्क, कर्तव्य, प्रमुख कलमे आणि रचनाकार

२. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महिलांची भूमिका राणी लक्ष्मीबाईपासून सरोजिनी नायडूंपर्यंत आणि त्यापुढील.

३. आधुनिक भारताचे प्रमुख टप्पेः अंतराळ तंत्रज्ञानातील प्रगती आणि यश.

४. नाभिकीय तंत्रज्ञानात भारताची यश कथा अणुतंत्रज्ञानातील भारताची यशोगाथा. या विषयावर आयोजित केलेली आहे

हे ही वाचा: नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता ३री ते ८वी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित !

ठळक वैशिष्ट्ये : ५ मिनिटांची व्दिभाषिक (हिंदी आणि इंग्रजी) प्रश्नमंजुषा, ज्यामध्ये जास्तीत जास्त २० प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. सर्व प्रश्नमंजुषांमधील एकत्रित कामगिरीच्या आधारावर विजेत्यांची घोषणा केली जाईल. सर्व सहभागीना ई-सहभाग प्रमाणपत्र मिळेल. अंतिम यादीतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी १५,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. प्रत्येकी ५००० रुपयांची ५० उत्तेजनार्थ बक्षिसे. सर्वोत्कृष्ट २०० सहभागींना (त्यांच्यासोबत एक बडोल/आई/पालक) दिनांक १५ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणा-या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी ई-निमंत्रण पाठवले जाईल.MY Bharat

Leave a Comment