गॅस बुकिंग कंपन्यांनी या सुविधा केल्या उपलब्ध ! तुमच्या मोबाईलवरूनच सिलेंडरची लाईव्ह लोकेशन तसेच डिलिव्हरी स्टेटस आणि पोहोचण्याआधीच वेळ सहज तपासू शकता. या विषयी सविस्तर माहिती
Table of Contents
LPG सिलेंडर बुक केल्यानंतर सिलेंडर वेळेवर पोहोचेल की नाही याची काळजी सर्वांनाच लागलेली असते. आता ही काळजी करण्याची गरज नाही, कारण आता तुम्ही सहजपणे तुमच्या मोबाईलवरूनच सिलेंडरची लाईव्ह लोकेशन तसेच डिलिव्हरी स्टेटस आणि पोहोचण्याआधीची वेळ सहज तपासू शकता.
गेल्या काही महिन्यांपासून गॅस टंचाईचा परिणाम संपूर्ण शहरी व ग्रामीण भागांमध्ये दिसून येत होता. यामागील कारण इराण आणि इस्राईल युद्ध गॅसच्या किमती देखील वाढलेला दिसून येत होत्या. या कारणामुळे गॅस बुकिंग लवकर मिळत नव्हते. गॅस बुक करण्यासाठी अनेक नियम सुरू करण्यात आले. गॅसची कमतरता असल्यामुळे गॅसची डिलिव्हरी उशिरा होऊ लागली. या कारणामुळे सिलेंडर बुक केल्यानंतर ते नेमके कधी ग्राहकांपर्यंत पोहोचेल हे समजत नव्हते. आता मात्र ही काळजी संपली आहे कारण ग्राहक घरबसल्या सिलेंडरची स्थिती तपासू शकतो.
गॅस कंपन्यांनी ग्राहकांसाठी अशी सुविधा उपलब्ध केली आहे, की त्यामुळे सिलेंडर बुक झाला की नाही व तसेच डिलिव्हरी साठी तो कधी निघणार आहे याची माहिती ग्राहकांना घरबसल्या मिळणार आहे. यामुळे डिलिव्हरी बाबतची अनिश्चितता कमी होईल.
मोबाईल द्वारे ट्रेकिंग
Bharat gas, HP gas आणि Indane या संपूर्ण कंपन्या अधिकृत मोबाईल ॲप उपलब्ध करणार आहे. ग्राहकांनी हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी व तसेच नंबरचे लॉगिन करावे.
ॲप मध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला my booking, track cylinder अशा पर्यायांमध्ये जाऊन तुम्ही बुक केलेल्या सिलेंडरची स्थिती पाहू शकता, तेथे तुम्हाला बुकिंगची तारीख डिलिव्हरी संबंधित माहिती आणि डिस्पॅच अपडेट मिळतील.
वेबसाईटद्वारे माहिती
जर तुम्हाला ॲप वापरता येत नसेल, तर तुम्ही संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईट द्वारे देखील सिलेंडरचे ट्रेकिंग करू शकता. परंतु यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा LPG ID आवश्यक असेल.
Call व SMS द्वारे तपासा
ज्या ग्राहकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नसेल त्यांना SMS आणि IVRS p द्वारे माहिती मिळत राहील. आणि IVRS नंबर वर कॉल करून ग्राहक सिलेंडरची स्थिती जाणून घेऊ शकतो.
हे ही वाचा: “एक पेड मां के नाम” मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये वृक्षारोपण मोहीम
Indane Gas: 7718955555
HP Gas: 7903105555
Bharat Gas: 7715012345
या नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग, रवाना झाले की नाही आणि डिलिव्हरीबाबतची माहिती सहज मिळवू शकता.






