महिलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी समिती स्थापन होणार

महिलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी समिती स्थापन होणार या विषयी सविस्तर माहिती

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 कायदयाची अंमलबजावणी
सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा शिक्षण विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक या शाळांच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 कायदयाची अंमलबजावणी करणेबाबत संदर्भ कळविण्यात येत आहे.

हे ही वाचा: आईचे नाव बंधनकारक : कोणकोणत्या कागदपत्रांवर ?

सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, शिक्षण विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक या शाळांच्या / कार्यालयच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 कायदा अंतर्भूत असलेल्या सर्व आस्थापना (Work Place) यांनी कलम 19(b) कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच समित्यांना यापूर्वी विशाखा समिती असे नाव देण्यात आले होते तथापी सदस्थितीत समित्यांना” अंतर्गत समिती” (Internal Committee) असे नावं देण्यात आलेले आहे.

हे ही वाचा: नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार

८ दिवसाचे आत आपल्या शाळा स्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती स्थापन करावी व आपल्या अधिनस्त असलेल्या १० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या शाळेतील आस्थापनावर अंतर्गत निवारण समित्ती नमूद विहित तक्त्यात स्थापन करून स्थानिक अंतर्गत तक्रार समितीचे आदेश शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, नाशिक महानगपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक ४२२००२ या पत्त्यावर सादर करावी. समितीमध्ये नोडल अधिकारी व किमान ३ शिक्षक / शिक्षिका असणे आवश्यक आहे. माहिती दिनांक २९/०४/२०२४ पर्यत शिक्षण विभाग कार्यालयात दोन प्रतित सादर करण्यात येतील

Leave a Comment