“आमच्या पप्पांनी गणपती आणलाय”. गाण्यावर स्टार झालेला साईराज केंद्रे बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Table of Contents
आज च्या युगात Social media वर माणूस खूपच सक्रीय झाला आहे. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण Instagram, Facebook, WhatsApp, YouTube चा वापर करतात. काहीजण त्याचा वाईट प्रकारे उपयोग करतात तर काहीजण चांगल्या प्रकारे वापर करतात.aamachya pappani ganapati aanalay Who is the famous little star toddler ?
हेही वाचा: “गुणवंत शिक्षक पुरस्कार” साठी चंद्रकांत कोरबू यांची राष्ट्रीय पातळीवर निवड !
डिजिटल युगात बरेच जण Social media वर active आहेत. त्यामध्ये Instagram तर खूपच मोठ्या प्रमाणावर लोक वापरत आहेत. Instagram या ॲपवर लोकांना Reels बनवण्याचा छंद च लागलेला आहे.लोकांना यावर आपल्या विविध कलाकृती सादर करता येऊ शकतात.अशातच एक छोटासा चिमुकला रातोरात स्टार झाला आहे. लहान वयात एवढा मोठा रील स्टार होणं किती कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याच्या या यशाला हातभार लावला तो Social media नेच . एवढ्या लहान वयात एवढ मोठ शिखर गाठायचं ही काही साधी गोष्ट नाही .
“आमच्या पप्पांनी गणपती आणलाय” ह्या गाण्याने एका छोट्याशा गावातला मुलगा रातोरात स्टार बनला आहे. त्याचे नाव आहे साईराज गणेश केंद्रे ‘हा चार वर्षाचा चिमुकला आहे. आज तो Reels स्टार बनला आहे. सर्वत्र चर्चेत आणि गाजत असलेला हा बाल कलाकार साईराज आता रील स्टार झालेला असून त्याचा हा व्हिडिओ तब्बल आतापर्यंत दोन कोटी लोकांनी बघितला आहे.
हेही वाचा: 30 मिनिटात 1 हेक्टर जमीन मोजणी आता शक्य !
ज्येष्ठ नेत्या चित्राताई वाघ यांनी याचं कौतुक केले आहे. तो सध्या LKG मध्ये शिकत आहे. शाळेमध्येही तो खूप हुशार आहे. समंजस देखील आहे. तो बीडच्या परळी मधल्या कन्हेरवाडी गावचा रहिवासी आहे. आता येत असलेल्या बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर त्याने बापाच्या गाण्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामुळे तो रातोरात स्टार बनला आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव माणसाचे लक्ष वेधून घेतात. त्याने अनेक गाण्यावर व्हिडिओ तयार केले आहेत .
नुकताच रिलीज झालेला “वेड” हा चित्रपट, त्यातील गाण्याचा व्हिडिओ त्याने तयार केला आहे . त्याचे स्वप्न आहे की मोठे झाल्यावर त्याला वेड चित्रपटाचा अभिनेता रितेश देशमुख यांच्यासारखे बनायचे आहे. रातोरात स्टार झाल्यामुळे त्याच्या अनेक ठिकाणी मुलाखती घेण्यात आल्या आहेत .ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे. तो दीड वर्षाचा असल्यापासूनच त्याला या सर्व गोष्टींची आवड आहे .त्याला त्याच्या वडिलांचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळे तो हे करू शकला. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या वडिलांनी हा व्हिडिओ तयार केला होता.
हेही वाचा: “कौन बनेगा अभ्यासपती” अनोखा उपक्रम पाथर्डीगांव मधील मनपा शाळा क्र.86 मध्ये संपन्न !
.”माझ्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यामुळेच तो आज स्टार बनला आहे.त्या व्हिडिओला दोन कोटी view आहेत. त्याच्या हावभाव द्वारे तो लोकांचे लक्ष वेधून घेतो. त्याची पहिली कविता ‘ए आई मला पावसात जाऊ दे ‘हा व्हिडिओ 2021 मध्ये व्हायरल झाला होता.
“माझ्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यावर सुप्रसिद्ध रील स्टार म्हणून साईराज चे कौतुक करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी देखील त्याची भेट घेऊन कौतुक केले आहे. त्याने खूप गाणी आणि कविता देखील म्हंटली आहेत .त्याच्या या यशाचे कौतुक त्याच्या आजी आजोबांना, आई-वडिलांना आहेच पण त्याच्या धाडसाचे कौतुक ही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांनी देखील या चिमुकल्याची भेट घेतलीआहे.