“गुणवंत शिक्षक पुरस्कार” साठी चंद्रकांत कोरबू यांची राष्ट्रीय पातळीवर निवड !

“गुणवंत शिक्षक पुरस्कार” साठी चंद्रकांत कोरबू यांची निवड नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातून खेड मधून झाली आहे.

निस्वार्थी आणि सेवाभावी वृत्तीने चांगले काम करणा-या गुरुजनांचा सन्मान करणे समाज,शासन आणि सामाजिक संस्था यांचे कर्तव्य असते.या शिक्षकांच्या कार्याचा गौरव हा शिक्षक दिनाच्या निमित्ताने करण्यात येत असतो. ५ सप्टेंबर शिक्षक दिन जसा जसा जवळ येऊ लागतो तसे तसे निस्वार्थी आणि सेवाभावी वृत्तीने चांगले काम करणा-या गुरुजनांची दखल शासन,सामाजिक संस्था या घेत असतात. National level selection of Chandrakant Korbu for Meritorious Teacher Award”.

हेही वाचा: मोकळ्या जागेपासून पैसे कसे मिळवू शकाल |यातील एक तरी पर्याय लागू पडेल.how you can earn money from open space

रत्नागिरी जिल्हा परिषदे मधील पदवीधर शिक्षक चंद्रकांत दत्तात्रय कोरबू यांची राष्ट्रीय पातळीवरील “गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड नुकतीच झाली आहे.चंद्रकांत कोरबू हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, भेलसई, फौजदारवाडी येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक उपक्रम शाळेत आयोजित केलेले आहेत.चंद्रकांत कोरबू यांनी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुर्गम भागात काम केले आहे.

हेही वाचा

“कौन बनेगा अभ्यासपती” अनोखा उपक्रम पाथर्डीगांव मधील मनपा शाळा क्र.86 मध्ये संपन्न !

अतिशय दुर्गम अशा ठिकाणी काम करून यशस्वी विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. रत्नागिरी सारख्या दुर्गम भागात आधुनिक पद्धतीने शिक्षण मुलांना मिळावे म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत.त्याबाबत सविस्तर माहिती अशी कि,चंद्रकांत कोरबू यांनी शाळा पूर्ण डिजिटल केलेली असून शाळेत लॅपटॉप, प्रोजेक्टर द्वारे अध्यापन करण्यास सुरवात केली आहे.

अशा या त्यांच्या प्रयत्नामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेत आधुनिक शिक्षणाची पायाभरणी च झाली असे म्हणावे लागेल. चंद्रकांत दत्तात्रय कोरबू यांची अखंड नेमणुकीची तारीख २१ डिसेंबर २००१ असून एकूण सेवा २१ वर्षे इतकी आहे. National level selection of Chandrakant Korbu for Meritorious Teacher Award”.
2005 (NCF) राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, 2010 (SCF ) राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन्ही वेळेस राज्य पातळीवर (पुणे ) व विभाग पातळीवर (कोल्हापूर ) 2005 पासून दोन्ही ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झालेली होती व आज ही ब- याच प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत असतात.

महाराष्ट्र राज्याच्या Content Enrichment Program मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातुन प्रतिनिधी म्हणून राज्यस्तरावर एकमेव निवड चंद्रकांत कोरबू यांची झाली होती.
अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशन इंडिया कडून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार या अगोदर प्राप्त झाला होता.

सदर पुरस्काराबद्दल रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये बी. डी. ओ. व पंचायत समिती सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांकडून पंचायत समितीत अभिनंदनाचा ठराव एकमुखाने संमत झाला होता.

तशा ठरावाची प्रत बी. डी. ओ. कडून शाळेला पाठवून अभिनंदन करण्यात आले होते.सदर पुरस्कारापासून ऊर्जा घेऊन शिक्षण खात्यात आज ही त्यांची अविरत सेवा सूरू आहे.

या सर्व बाबींची दखल अविष्कार फौंडेशन इंडियाने घेतली असून त्यांच्या शिक्षण क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल अविष्कार फौंडेशन कडून त्यांची सन २०२३ च्या “गुणवंत शिक्षक पुरस्कार” साठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे पार पडणार आहे.

हेही वाचा

गिरलिंग मंदिर, जुना पन्हाळा कुकटोळी. महाराष्ट्राला या ठिकाणाबद्दल माहिती आहे का ? Girling Temple, Old Panhala Kuktoli. Does Maharashtra know about this place?

Leave a Comment