प्रजासत्ताक दिन (Republic day 2024) परेड दरवर्षीप्रमाणे आयोजित येणार असून तुम्हाला जर परेड पाहायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात. याविषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
प्रजासत्ताक दिन व स्वतंत्र दिन हे दोन दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे दिवस असतात व हे दोन दिवस भारत मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो, त्याचबरोबर या दोन्ही दिवसांमध्ये परेड आयोजित करण्यात येत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येईल. त्यासाठी तयारी ही सुरू आहे.
हे ही वाचा: नाशिक जिल्हास्तरीय बालमहोत्सव : 2024 खुली रंग भरण स्पर्धा सहभागी व्हा
यावर्षी कर्तव्य पथावर होणाऱ्या परेडची जोरदार तयारी सुरू आहे. रिहर्सल ही एवढ्या कडाक्याच्या थंडीत देखील सुरूआहे. हे वर्ष भारतासाठी खूप खास आहे कारण भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. दरवर्षी ज्याप्रमाणे कर्तव्य पथावर परेड आयोजित करण्यात येते तसेच यावर्षी देखील कर्तव्य पथावर परेड हीआयोजित करण्यात येणार आहे.
प्रत्येकाला परेड पाहण्यास उत्सुकता वाटत असते. तुम्हालाही परेड पाहायला जायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी तिकिटांबद्दल माहिती जाणून घ्यावी लागेल.
जर तुम्हाला परेड पाहण्यासाठी जायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन तिकीट बुक करावे लागतील. यासाठी तिकीट कसे बुक करावे ? याविषयी माहिती जाणून घ्या.
हे ही वाचा: नाशिक मधील ध्रुवनगर मनपा शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न
तिकीट कसे काढावे
- प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तुम्हाला जर तिकीट काढायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी अधिकृत वेबसाईट aamantran.mod.gov.in वर जावे लागेल.
- या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ‘book your ticket here’ वर क्लिक करावे.
- त्यानंतर ‘Register to book ticket’ वर क्लिक करा व त्यावर तुमचे पूर्ण नाव नोंद करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी नोंद करावा लागेल.
- त्यानंतर तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाका आणि ‘Request OTP’ वर क्लिक करा.
- मग रजिस्टर वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला लॉगिन करावा लागेल. पुढील प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्याबरोबर जे येण्यास इच्छुक असतील त्यांच्यासाठी परेडची तिकीट बुक करू शकतात.
हे ही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी साठी पत्राद्वारे संदेश
तिकिटाचे दर
- व्हीव्हीआयपी जागांच्या मागे असलेल्या सीटची किंमत 500 रुपये आहे.
- दुसऱ्या तिकिटाची किंमत 100 रुपये आहे.
- तिसरे तिकीट ची किंमत 20 रुपये आहे.
परेडचे तिकीट काढण्यासाठी सरकारी ओळखपत्र असणे खूप आवश्यक आहे. अशाप्रकारे तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेड पाहण्यास जाऊ शकता.