नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची मनपा शाळा क्रमांक 22 धृवनगर येथील शाळेत 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.
Table of Contents
नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगर ही एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखले जाते. या शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी हा होय.
हे ही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी साठी पत्राद्वारे संदेश
त्यानुसार नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 22 मध्ये आज 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ.जगताप या उपस्थित होत्या. त्याचबरोबर पालक ही उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करून विद्यार्थी आले होते. इयत्ता पहिली ते पाचवीच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे केली.
काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर गाणी सुद्धा गायली. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका लता सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कविता सर्वांसमोर सादर केली. सौ.जगताप यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंचा आदर्श आपणही घेतला पाहिजे यावर त्यांनी संदेश दिला. आज महिला पुरुषाबरोबर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत याविषयी त्यांनी भाष्य केले.
हे ही वाचा: नोकरीची संधी : 27 हजार वेतनाची नोकरी |असा करा अर्ज
ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा केलेली होती त्या त्या विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमशील शिक्षक ईश्वर चौरे यांच्याकडून पेनचे बक्षीस स्वरूपात वाटप करण्यात आले. त्याबद्दल त्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांच्याकडून करण्यात आला.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. उपशिक्षिका लता सोनवणे, कल्पना पवार, दिपाली काळे, उपशिक्षक नामदेव जानकर,संतोष महाले आणि ईश्वर चौरे यांचे कार्यक्रम पार पडण्यासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर चौरे यांनी केले.