नाशिक जिल्हास्तरीय बालमहोत्सव : 2024 खुली रंग भरण स्पर्धा सहभागी व्हा

नाशिक: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अंतर्गत खुली रंग भरण स्पर्धेला नामांकने पाठवा या विषयी सविस्तर माहिती.

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत अनाथ निराधार बालकांच्या बालगृहातील व संस्थाबाहय बालकांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव २०२४ दि.०४/०१/२०२४ ते दि.०६/०१/२०२४ रोजी मिनाताई ठाकरे स्टेडीअम, हिरावडी जवळ, मुंबई आग्रा हायवे, औरंगाबाद नाका, नाशिक येथे बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सदर महोत्सवाच्या उदघाटनाकरिता मा. मंत्री महोदया महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य कु. मा.ना. आदिती वरदा सुनिल तटकरे या उपस्थित राहणार आहेत.

हे हि वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी साठी पत्राद्वारे संदेश

सदर बाल महोत्सव अंतर्गत दि.०४ जानेवारी २०२४ रोजी रंग भरण जिल्हा महिला आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेकरीता आपले अधिनस्त महानगर पालिका शाळेतील छोटा गट इ.१ ली ते ६ वी व मोठा गट इ.७ वी ते १० वी या गटातून प्रत्येक शाळेतुन छोटा गट प्रत्येकी १ विद्यार्थी व मोठा गट प्रत्येकी १ विद्यार्थी असे एका शाळेतुन २ विद्यार्थी स्पर्धेसाठी पाठविणेबाबत आपल्यास्तरावरुन संबंधित सर्व महानगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापक यांना सुचित करावे ही विनंती. सदर स्पर्धेकरीता पाठवण्यात येणा-या दोन विद्यार्थीची नावे या कार्यालयाकडुन पुरविण्यात येणा-या गुगल लिंकवर भरुन सादर करावी हो विनंती.

स्पर्धेच्या अटी व शर्ती :

१.प्रत्येक शाळेतुन फक्त दोन नामांकने पाठविण्यात यावी.

२ .स्पर्धेकरिता रंगभरण साहित्य आयोजकांकडुन पुरविण्यात येईल.

३. स्पर्धेकरिता गुगल लिंकवर पूर्वनोंदणी करणे आवश्यक राहील. गुगल लिक व्हॉट्सअँप कळविण्यात येईल. दिनांक ०३/०१/२०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत नोंदणी करता येईल.

४. स्पर्धेकांसोबत एक जबाबदार शिक्षक/पालक यांना उपस्थित ठेवावे. स्पर्धेकांना स्पर्धेच्या ठिकाणी ने/आण करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षक/पालक यांची राहील. ने/आण करण्यासाठी कोणताही खर्च पुरविण्यात येणार नाही.

५. विजेत्याची नावे स्वतंत्रपणे संबंधित मुख्याध्यापक यांना कळविण्यात येतील. विजेत्या स्पर्धेकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल. विजेत्यांना बक्षीस वितरण दिनांक ०६/०१/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात येईल.

६. स्पर्धेसंदर्भात निकालासंदर्भात अनुक्रमे आयोजकांचा/परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

हे हि वाचा: नोकरीची संधी : 27 हजार वेतनाची नोकरी |असा करा अर्ज

स्पर्धेचा तपशिल :-

१. छोटा गट- इ.१ ली ते इ.६ वी

३. स्पर्धेचा दि.०४/०१/२०२३ ४. स्पर्धेची वेळः-११.०० वाजता

२. मोठा गट-इ.७ वी ते इ.१० वी ५.

स्पर्धेचे ठिकाणः-

मिनाताई ठाकरे स्टेडीअम, हिरावडी जवळ, मुंबई आग्रा हायवे, औरंगाबाद नाका, नाशिक ६. स्पर्धेकरिता संपर्क व्यक्तीः-१. श्री. एस. आर. कडाळे, संरक्षण अधिकारी, (क) मो. ९७६५५२६१२० २. श्री. आर. आर. अमृतकर, संरक्षण अधिकारी (क) मो.९५७९४४२२५१

Leave a Comment