बैलपोळा सण मनपा शाळा क्र.22,33 धृवनगर,महादेवनगर मध्ये साजरा.


बैलपोळा सण मनपा शाळा क्र.22,33 धृवनगर,महादेवनगर नाशिक मध्ये साजरा करण्यात आला.

शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच जोमाने माझा सर्जा राजा म्हणजे आमची जिवा-शिवाची बैलजोडी.याच बैलांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस म्हणजे बैलपोळा हा सण.आपल्या शाळेत येणाऱ्या मुलांना या सणाची माहिती व्हावी म्हणून शाळेत बैलपोळा सण साजरा केला गेला.

मनपा शाळा क्र. 22 धृवनगर व मनपा शाळा क्र. 33 महादेव नगर येथील शाळेत बैलपोळा सणाच्या निमित्ताने मातीचे बैल बनवून घेतले.मनपा शाळा क्र २२ ध्रुवनगरच्या विद्यार्थ्यांनी स्वत: मातीचे बैल तयार केले होते.त्याचबरोबर बाजारात उपलब्ध बैलजोडी ही यावेळी मुलांनी पूजेसाठी आणली होती.

हे ही वाचा

शाहरुख खानच्या’ जवान ‘ची 7 दिवसात Box office वरील कमाईचे आकडे

बैलपोळा सण

हा उपक्रम बुधवार दिनांक 13 सप्टेंबर २०२३ रोजी मनपा शाळा क्र.२२ धृवनगर व मनपा शाळा क्र.३३ महादेवनगर नाशिक मध्ये साजरा करण्यात आला .

मनपा शाळा क्र. 33 महादेवनगर ची अनुष्का घोडे इयत्ता ७ वी ,अतुल जाधव इयत्ता ७ वी या विद्यार्थ्यांनी शेतकरी कुटुंबाची वेशभूषा करून पारंपरिक पद्धतीने बैलजोडी चे पूजन केले.गवत व धान्य असा नैवेद्य, जोडीला पुरणपोळी असे ही अर्पण करण्यात आले.मुख्याध्यापिका शितल विजय आहिरे यांनी बैलपोळा या सणाची माहिती दिली.श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन आणि पिठोरी अमावास्या म्हणजेच पोळा याची माहिती सांगितली.आपले सण आणि मराठी महिन्यांची गंमत आणि विज्ञान याची सांगड घालून सर्व अन्नधान्य आणि त्यांचे महत्व देखील यावेळी पुष्पावती मेतकर यांनी सांगितले.

हे ही वाचा

शाहरुख खानच्या “जवान” चित्रपटाने ने दाखवला आरसा आणि आसमान एकाच वेळी !

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे.पारंपरिक शेतीला आता आधुनिक यंत्राची जोड मिळाली आहे.याच शेती व्यवसायामुळे आपल्याला अन्नधान्य उपलब्ध होते.त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन देखील करावे लागते.तृणधान्य व त्यांचे महत्व देखील यावेळी सांगितले.उपशिक्षिका काजल यांनी सुंदर फलक लेखन केले होते.शेती आणि आपले सण यावरील गीतावर मुलांनी ठेका धरून नृत्य ही केले.श्रीमती उज्वला आहेर,श्रीमती मंगला शेलार,सौ कांचन पवार,श्री भगवान सोनार,श्री संजय सोनवणे,श्री जितेंद्र प्रभाळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन ,सजावट यासाठी सहकार्य केले.

हे ही वाचा

निपाह व्हायरस ची दहशत : निपाह संपुर्ण माहिती.देशात अलर्ट

महानगरपालिका शाळा क्र. २२ धृवनगर मध्ये हिंदी दिवस ही साजरा करण्यात आला.यावेळी महानगरपालिका शाळा क्र २२ धृवनगर च्या विद्यार्थ्यांनी हिंदी नाटिका सादर केली.त्याचबरोबर मनपा शाळा क्र. २२ चे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांनी बैलपोळा या सणाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. उपशिक्षक नामदेव जानकर यांनी हिंदी दिवस याबाबत माहिती सांगितली. मुलांनी शेतक-याची वेशभूषा केली होती.

बैल व शेतकऱ्याबाबत महती सांगणा-या गाण्यावर मुलांनी मनसोक्त नृत्ये केली.कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षिका दिपाली काळे यांनी केले.उपशिक्षक संतोष महाले यांनी कार्यक्रम आयोजन करण्यास सहकार्य केले.सकाळ सत्रातील शिक्षक व विद्यार्थांनी ही अशाच प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Leave a Comment