कंत्राटी भरती अखेर रद्द : देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

कंत्राटी भरती अखेर रद्द, देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद.

महाराष्ट्रात कंत्राटी भरती केली जाणार असा जीआर निघाल्यावर सगळीकडे शिक्षण क्षेत्र व युवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी याला प्रचंड विरोध केला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातील युवकांनी सुद्धा यास विरोध केला होता.Contract recruitment finally cancelled: Devendra Fadnavis’ announcement.

हे ही वाचा : थ्री फेज स्टार्टर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ! ॲपच्या माध्यमातून नियंत्रण.


यावर सरकारने काही पावली मागे घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याची माहिती दिली आहे. यावेळी ते हे सांगताना विसरले नाहीत की मागील सरकारने कंत्राटी भरती चा निर्णय घेतलेला होता . तो आम्ही पुढे नेणार होतो. त्यांच्या पापाचे ओझे आम्ही का उचलायचे असे म्हणत त्यांनी पत्रकार परिषदेत आज घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे मागील सरकारचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा

Grass Cutter शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार ! किंमत किती जाणून घ्या


मुंबईतील पोलीस भरती बाबत सुद्धा असाच संभ्रम लोकांमध्ये पसरवला जात असल्याचे ते बोलत होते. मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती होणार नाही तर नियमित भरती होणार आहे याबाबत ते बोलले.
18331 मध्ये 7076 पोलीस शिपाई 994 वाहक चालक यांची भरती होणार आहे. भरतीनंतर नियुक्तीपत्र दिल्यानंतर पोलिसांचे प्रशिक्षण घेण्यात येते. या प्रशिक्षणामध्ये बराचसा काळ निघून जातो. त्यामुळे पोलीस दल रिकामे ठेवता येत नाही. प्रशिक्षणातील पोलीस रुजू होई पर्यंत 3000 पोलीस जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जे महाराष्ट्र शासनाचाच एक भाग आहे त्यांच्या सेवा वापरल्या जातात.

हे ही वाचा : लेक लाडकी योजना राज्यात मुलींना करणार लखपती ! मिळणार असे पैसे


महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या पाठीमागे भक्कम उभे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
सध्या तरी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींना शिक्षकांना या कंत्राटी भरतीपासून मुक्ती मिळालेली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Leave a Comment