आयुष्यमान कार्ड काढलं का ? शेतकऱ्यांनो !

आयुष्यमान कार्ड काढलं का ? शेतकऱ्यांनो ! याविषयी सविस्तर वृत्तांत

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या जनतेसाठी आरोग्य उपचार मोफत मिळावे यासाठी केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे. देशातील अनेक लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये पाच लाखापर्यंत उपचार केले जातात.

हे ही वाचा: जुन्या वाहनांसाठी HSRP बसवण्याची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली

शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार असून याकरिता वाशिम जिल्ह्यातील 11 लाख 58 हजार 957 पैकी 5 लाख 5 हजार लाभार्थींनी आयुष्यमान कार्ड काढले आहे. आयुष्यमान कार्ड नसल्यास मोफत उपचार घेण्यास अनेक अडथळे येऊ शकतात. सर्वांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

आयुष्मान कार्ड (ayushman card) नसल्यास मोफत वैद्यकीय उपचार घेण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत योजना) नागरिकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत.

हे ही वाचा: दिनकर आण्णा पाटील यांची मनसे राज्य सरचिटणीस पदी निवड : मनसे शिक्षक सेनेकडून सत्कार

या योजनेंतर्गत १३५६ आजारांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्व्हेक्षणातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांची जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यात या योजनेसाठी ११ लाख ५८ हजार ९५७ लाभार्थी पात्र ठरले आहे. १८ मार्च पर्यंत ५ लाख ५ हजार लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे ई-कार्ड/गोल्डन कार्ड काढले आहे.

हे ही वाचा: नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत वीर बाल दिवस साजरा होणार आज !

कोठे काढणार कार्ड?

CSC (कॉमन सर्विस सेंटर) किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावून कार्ड काढता येते. स्वतःच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला द्यावा, म्हणजेच ई-कार्ड त्वरीत तयार होईल.

हे ही वाचा: बाबासाहेब जानकर यांची मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य सहसचिव पदी निवड

कागदपत्रे काय लागतात?

इ कार्ड काढण्यासाठी आयुष्यमान भारत पत्र, रेशन कार्ड व आधार कार्ड अनिवार्य आहे. पी एम जी वाय अंतर्गत या गंभीर आजारांवर विमा कव्हर होतो कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, हृदयरोग, यकृताचे आजार, श्वसनाचे आजार, न्यूरोलॉजिकल विकार, मानसिक आजार, जळलेल्या जखमा, नवजात मुलांचे आजार, जन्मजात विकार, संसर्गजन्य रोग (जसे की क्षयरोग आणि मलेरिया), डेकेअर प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया आदींसह जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण १३५६ आजारांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना मोफत आरोग्य उपचार घेणे सुलभझाले आहे.

Leave a Comment