दिनकर आण्णा पाटील यांची मनसे राज्य सरचिटणीस पदी निवड : मनसे शिक्षक सेनेकडून सत्कार

दिनकर आण्णा पाटील यांची मनसे राज्य सरचिटणीस पदी निवड : मनसे शिक्षक सेनेकडून सत्कार याबाबत सविस्तर वृत्तांत

नाशिक मनपा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने मनसे सरचिटणीस दिनकर आण्णा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
नाशिक महानगरपालिके चे माजी सभागृहनेते दिनकर आण्णा पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना नाशिक यांच्या वतीने शाल, हार, बुके देउन त्यांचा सत्कार करण्यात आला.

हे ही वाचा: नाशिक महानगरपालिका शाळा क्र.71 रायगड चौक सिडको या शाळेचे स्नेहसंमेलन प्रचंड उत्साहात संपन्न

मनसे सरचिटणीस

याप्रसंगी नाशिक मनपा शिक्षण विभागातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मनसे सरचिटणीस दिनकर आण्णा पाटील यांनी नाशिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नासाठी मनसे खंबीर पणे उभी राहील, लढा देईल असे आश्वासन मनसे शिक्षक संघटना शिष्टमंडळाला दिले.

दिनकर आण्णा पाटील यांना नाशिक च्या राजकारणातील एक मोठे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात विविध पदे यशस्वीपणे भूषवली आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. सामान्य माणसांची कामे नेहमी त्यांच्याकडून होत असतात. त्यामुळे सामान्यांचा एक आधार म्हणून दिनकर आण्णा पाटील यांना ओळखले जाते. नुकतीच त्यांची वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस म्हणून नेमणूक झाल्याने सामान्य जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस पदाला ते नक्कीच न्याय देतील यात शंका नाही.

हे ही वाचा: एस टी महामंडळातील एक आदर्श व्यक्ती : इम्रान मन्सुरी

यावेळी नाशिक मनपा मनसे शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष सुरेश खांडबहाले, सरचिटणीस शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष योगेश सुर्यवंशी, कोषाध्यक्ष वैभव अहिरे, चांगदेव सोमासे, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष उमेश महाले व पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे शिक्षक संघटनेच्या वतीने, सुरेश खांडबहाले, शिवाजी शिंदे यांनी दिनकर आण्णा पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment