शेतकऱ्यांना मिळणार आता Kisan Credit Card : याबाबत संपूर्ण माहिती.
महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत.या सुविधा धोरणांचे अवलंबन करणे ही काळाची गरज आहे आणि त्या गरजेच्या अंमलबजावणी साठी सरकार प्रयत्न करत आहे.भारत देश हा कृषिप्रधान देश मानला जातो. आरोग्य विषयक सेवा सुविधा,आर्थिक अडचणी ,नैसर्गिक आपत्ती, या प्रसंगी विशिष्ठ ठिकाणी, विशिष्ठ प्रसंगी सरकारने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या आहेत.एक हात मदतीचा`कायम जपला जात आहे.
तसेच सरकारने शेतकऱ्यांसाठी kisan Credit Card विकास योजना सुरू केली आहे. त्यामध्ये कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. हे कार्ड मिळवण्याची प्रक्रिया ही सहज व सोपी आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या प्रमुख गरजांचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये ठराविक शेतकरी सोडून इतर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.
हे पण वाचा : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचे विचार.
किसान Credit Card कसे मिळवायचे :
1.kisan Credit Card दोन्ही पद्धतीने मिळवता येते ऑनलाइन किंवा ऑफलाइन
जर आपल्याला ऑफलाइन पद्धतीने Credit Card हवे असेल तर जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा हे kisan credit card डिजिटल असल्यामुळे ते मिळवण्यासाठी घरा बाहेर जाण्याची गरज नाही. ते घरबसल्याही मिळू शकते .
2. अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये kisan क्रेडिट कार्ड मिळते.
3. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करताना आधार कार्ड,जमिनीची कागदपत्रे,मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड बँक, खात्याची माहिती, शिधापत्रिका ,इत्यादी कागदपत्रांची पूर्तता असणे बंधनकारक आहे.तरच शेतकरी Credit Card कार्ड मिळवू शकते.
हे पण वाचा : Tata Technologies IPO बाबत अशा आहेत पुढील घडामोडी !
यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, अक्सिस बँक पंजाब ,नॅशनल बँक ,आयसीसीआयसीसीआय बँक, बँक ऑफ बडोदा ,एचडीएफसी बँक, इत्यादी बँका मध्ये किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतो.
तसेच बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.यामध्ये अतिवृष्टी,पूर,वादळ,भूकंप, ढगफुटी,इत्यादीचा समावेश आहे.यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते.त्यात शेतकरी खूप कर्जबाजारी होतात. शेतकऱ्यांना कर्ज काढून शेतीची कामे करावी लागतात.त्यांना हातभार लावण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या त्यापैकी एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना. योजना केंद्र सरकार घेऊन आले आहे. यामध्ये शेतकऱ्याला तीन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते. हे कर्ज 4 टक्के व्याज दराने दिले जाते.ज्या शेतकऱ्याचे वय 18 ते 75 या वयोगटांमध्ये आहे तो या कार्डसाठी पात्र ठरू शकतो व त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. तसेच त्या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती असणे गरजेचे आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देते आहे. ही खूप चांगली बाब आहे. ही भारत सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे.