राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचे विचार.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वय मर्यादा बदलणार.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता ५८ ऐवजी ६० वर्षे पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त व्हावे लागणार असल्याचे समजते.सेवानिवृत्ती नियम प्रत्येकाला याचे पालन करावेच लागते. ठराविक वयापर्यंत आपली नोकरी करू शकतात. ती मर्यादा आता सरकार कडून वाढली जाणार असण्याची शक्यता आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवेत नियुक्त दिनांक नुसार पेन्शन आहे.परंतु जुन्या पेन्शन योजनेला पुन्हा मान्यता मिळावी.अशी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची विनंती आहे .या पेन्शन योजनेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला आर्थिक लाभ मिळत असतो. तसेच सध्या अ, ब आणि क प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्ष आहे आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष आहे. पण अ ,ब  आणि क या प्रवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वय अनेक वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे, पण यात काही बदल करण्यात येणार असल्याचे समजते.

हेही वाचा: Tata Technologies IPO बाबत अशा आहेत पुढील घडामोडी !

याबद्दल मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या निर्णयाला लवकरात लवकर मान्यता मिळेल असे दिसून येते आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 58 वर्षांवरून ६० वर्ष होणार असल्याचे असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. अशी संपूर्ण माहिती राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांचे वय हे गेल्या काही वर्षांपासूनच 58 वरून 60 वर्ष करण्यात येणार आहे असे बोलले जाते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही अतिरिक्त सेवेचा दोन वर्ष लाभ मिळावा म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षांवरून ६० वर्ष होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच त्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक ही घेण्यात आली होती.

हेही वाचा:वेळापत्रकात असणार आनंदाचा तास : शाळांमध्ये येणार नवीन उपक्रम

या बैठकीच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी ठामपणे आश्वासन दिले आहे अशी माहिती मिळाली आहे. त्यामध्ये जुनी पेन्शन योजना हा मुद्दा नमूद केला गेला होता.त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळवून देणार असे दिसून येते आहे.

पूर्वी सरकारी कर्मचारी यांना सेवानिवृत्त झाल्यावर जुनी पेन्शन दिली जायची पण काही कारणास्तव गेल्या काही वर्षापासून हा नियम बंद करण्यात आला आहे व नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा परत चालू करावी यासाठी सरकारी कर्मचारी खूप आशावादी आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महासंघाने एका दिवसासाठी सामूहिक रजा आंदोलन केले होते. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती संदर्भात आणि जुनी पेन्शन योजना या दोन्ही गोष्टी बाबत चर्चा होणार आहे याची संपूर्ण माहिती महासंघाच्या संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग.दि कुलथे यांच्याकडून मिळाली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती चे वय 58 वर्षावरून साठ वर्ष व्हावे या निर्णयाला मान्यता लवकरात लवकर मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितले आहे.

Leave a Comment