वेळापत्रकात असणार आनंदाचा तास : शाळांमध्ये येणार नवीन उपक्रम

वेळापत्रकात असणार आनंदाचा तास : वाचन चळवळ वाढीसाठी शासन देणार प्रोत्साहन

महाराष्ट्र राज्यातील विविध शाळांमध्ये वाचन संस्कृती रुजावी व मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी यासाठी वाचन चळवळ राबविण्याच्या उद्देशाने व वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी एका नवीन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था व इतर घटकांचा सहभाग घेण्यात येणार आहे.Happy hour to be on the schedule: new initiative coming to schools

हे ही वाचा : नवीन SBI Debit card Activate या प्रकारे करता येऊ शकते

हा उपक्रम राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने व युनिसेफ, रीड इंडिया, प्रथम बुक्स यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.
यासाठी मुलांना इयत्तेनुसार वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समजते. इयत्ता तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना वाचन कौशल्य विकसित करणे गरजेचे आहेच ,पण या माध्यमातून ही मुलांना वाचण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठीचा एक वाचक वर्ग तयार होण्यास मदत होणार आहे.

मुलांमध्ये या उपक्रमामुळे मूल्य शिक्षणाचे महत्व समजणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणार असल्याचे समजते. या उपक्रमासाठी ब्रँड अँबेसिडर ची नेमणूक करण्यात येणार आहे. लोकांनी केलेल्या प्रयत्नांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म व इलेक्ट्रोनिक्स माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
शाळांच्या वेळापत्रकात 15 ते 20 मिनिटे आनंदाचा तास या उपक्रमाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असल्याचे समजते. त्याचबरोबर रीड इंडिया सेलिब्रेशन, ग्रंथोत्सव व पुस्तकांचे प्रदर्शन असे कार्यक्रम सुद्धा यासाठी आयोजित करण्यात येणार आहेत.

22 नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. शासकीय ग्रंथालय व शाळांची यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे. या दोघांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

Leave a Comment