Tata Technologies IPO बाबत अशा आहेत पुढील घडामोडी !

Tata Technologies IPO अलॉटमेंट तारीख,स्टॉक लिस्टिंग तारीख,रिफंड तारीख !

मुंबई : नुकत्याच आलेल्या Tata Technologies IPO ला शेअर बाजारात 69 पट अधिक बोली लावण्यात आली होती. टाटांच्या विश्वासाचा आणि मागील परंपरा यांचा विचार करून लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीज आय पीओवर लोकांच्या अक्षरश उड्या पडल्या आहेत. Tata Technologies IPO Allotment Date, Stock Listing Date, Return Date!

हे ही वाचा : वेळापत्रकात असणार आनंदाचा तास : शाळांमध्ये येणार नवीन उपक्रम

या शेअर साठी बोली लावण्याचा काल शेवटचा दिवस होता. यामध्ये रिटेल गुंतवणूकदारांनी 16 पट अधिक बोली लावण्यात आल्याचे बोलले जाते. टाटाच्या या शेअर बाबत बाजारात अधिक उत्सुकता होती. तो खुला झाल्या झाल्या अर्धा ते एक तासातच ओव्हर सबस्क्राईब झाला असे म्हटले जाते. जर कोणी टाटा टेक्नॉलॉजी आयपीओ साठी बोली लावली असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. शेअरचे अलॉटमेंट कधी होणार आहे ? कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शेअरचे अलॉटमेंट 30 सप्टेंबर रोजी होईल. ज्या लोकांना शेअर मिळाले नाही त्यांना १ डिसेंबर 2023 पासून रिफंड सुरू होईल.ज्या लोकांना शेअर प्राप्त झाले आहे, त्यांच्या डिमॅट अकाउंट वर ४ डिसेंबर रोजी शेअर दिसणार आहेत.

५ डिसेंबर 2023 रोजी बीएससी आणि एनएससी वर हे स्टॉक लिस्टिंग होणार आहेत. आयपीओची बोली प्रक्रिया संपली असून पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पाहूया टाटा च्या या आयपीओ काय कमाल करतो ते.

Leave a Comment