दिव्यांगासाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणाकरिता अर्थसहाय्य योजना याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे. अर्ज नमुना माहितीसाठी सर्वात खाली निळ्या अक्षरावर क्लिक करा.
Table of Contents
नाशिक महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाद्वारे दिव्यांगाना शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणाकरिता अर्थसहाय्य्य योजना अस्तित्वात आहे.दिव्यांग व्यक्ती अर्ज भरण्यास सक्षम नसल्यास त्यांच्या पालकानी अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ( गतिमंद,मतीमंद,बौद्धिक अकार्यक्षम व्यक्तींसाठी ) कोणती कागदपत्रे लागतात,काय अटीं आहेत याबाबत सविस्तर माहिती आता आपणा पाहूया.तर Financial aid scheme for scholarship and vocational training for disabled
हे ही वाचा : बेरोजगार दिव्यांगाना अर्थसहाय्य्य योजना|संपुर्ण माहिती
अटी व शर्ती, सुचना
१. महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करीत असलेबाबत पाणी बील, वीजबील, मालमत्ता कर पावती, वास्तव्याचा करारनामा, रेशनकार्ड या पैकी कोणतेही दोन पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
२. आधार कार्डची छायांकीत प्रत सादर करणे.
३. UDID कार्ड व ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र याबाबतची छायांकीत प्रत सादर करणे.
४. जन्माचा दाखला अथवा वयाचा पुरावा याबाबतची छायांकीत प्रत सादर करणे.
५. दिव्यांग व्यक्तीच्या अथवा दिव्यांग व त्याचा पालक यांचे जॉईंट अकांऊट असणाऱ्या बँकेच्या पासबुकची छायांकीत प्रत सादर करणे.
हे ही वाचा :दिव्यांगासाठी योजना : अतिशय फायदेशीर माहिती | संपुर्ण वाचा.
६. तक्त्यामधील मुद्या क्र. २ च्या अर्थसहाय्याकरीता लाभाथ्याने नोंदणीकृत असलेल्या तज्ञ (Rehab Professionl) व्यक्तीकडून थेरीपी / प्रशिक्षण घेत असलेले प्रमाणपत्र त्यांच्या नोंदणीकृत असलेल्या प्रमाणपत्रासहीत सादर करणे आवश्यक राहील.
७. सदर अर्जदार शासकीय अथवा शासनमान्य असलेल्या संस्थेत शिक्षण तथा प्रशिक्षण घेत असलेला पाहिजे किंवा RCM/ MCT महाराष्ट्र कौन्सिल फॉर OT / PT मार्फत नोंदणीकृत तज्ञ व्यक्तीकडे प्रशिक्षण घेत असलेला पाहिजे. ( लागु असल्यास )
८. तसेच शिक्षण तथा प्रशिक्षण घेत असल्याबाबतचे बोनाफाईड सर्टीफिकेट किंवा तज्ञ मार्गदर्शकाचे त्यांच्या लेटरहेडवर प्रमाणित करुन प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. तक्त्यामधील मुद्दा क्र. २ च्या अर्थसहाय्याकरीता लाभार्थ्यांने नोंदणीकृत असलेल्या (Rehab Profpssional) व्यक्तीकडून प्रशिक्षण घेत
शिफारस पत्र अर्जदाराचे स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
१०. नाशिक महानगरपालिकेच्या शाळामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सदर योजना लागु राहील.
११. शिक्षण संस्था, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र / अन्य सक्षम अधिकाऱ्याने प्राधिकृत केलेले कागदपत्र सादर करणे बंधनकारक राहील. तसेच मागील वर्षाचे उत्तीर्ण झालेबाबतचे गुणपत्रक सादर करणे आवश्यक राहील. (लागु असल्यास)
१२. त्या त्या आर्थिक वर्षाचे शिष्यवृत्ती मिळणेकरीता त्या त्या वर्षाच्या आर्थिक / शैक्षणिक वर्षात दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक राहील. त्या नंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. मागील शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
१३. सदर योजनेकरीता कौटुंबीक उत्पन्नांची कमाल मर्यादा र.रु. ४,००,०००/- (अक्षरी र.रु. चार लक्ष मात्र ) इतके
राहील. त्याकरीता अर्ज प्राप्त झाला त्या वर्षाच्या मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न दर्शविणारा तहसिलदार नाशिक यांचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. सदरची अट सुधारीत धोरणाचा आदेश निर्गमित झालेल्या आर्थिक वर्षापासून लागू राहील.
१४. बौध्दिक दृष्ट्या अक्षम असणारी दिव्यांग मुले अथवा व्यक्तीकरीता त्यांचे पालक अथवा कायद्यानुसार पालकत्व धारण केलेली व्यक्ती अर्ज सादर करतील.
१५. सदर आर्थिक वर्षामधील योजनेचा लाभ मिळविणेकरीता अर्जदारास इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय तसेच नामनपा मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग व इतर योजनेचा लाभ घेत नाही किंवा घेणार नाही. तसेच नोकरी अथवा कोणताही रोजगार करत नसल्याबाबत घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे.
(नाशिक महानगरपालिकेच्या धोरणानुसार एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ देय असल्यास लाभ घेता येईल.)
१६. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर परंतू संपूर्ण अर्ज व कागदपत्राची पुर्णत: पुर्तता केल्यास त्या पात्र अर्जदारास लाभ देण्यात येईल. (अपुर्ण कागदपत्र असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.)
१७. एखाद्या पात्र अर्जदारा संबंधित खोटे कागदपत्र जोडण्यात आले आहे, असे निदर्शनास आल्यास पात्र अर्ज, अपात्र करण्याचे किंवा लाभार्थ्यांवर कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार मा. आयुक्त, नामनपा यांना राहतील. १८. सर्व छायांकीत प्रती स्वसाक्षांकीत करणे आवश्यक आहे.
१९. सदरचा अर्ज विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह रजिष्टर / स्पीट पोष्टाने खालील नमुद पत्त्यावर सादर करावा. पोस्टाचा पत्ता :- उप आयुक्त (समाज कल्याण) समाज कल्याण विभाग, नाशिक महानगरपालिका, तळ मजला, राजीव गांधी भवन, शरणपूररोड, नाशिक – ४२२००२
याबाबत अर्जाचा सविस्तर नमुना आणि सविस्तर माहिती याठिकाणी पाहूया : या निळ्या ओळीवर क्लिक करा आणि संपुर्ण माहिती पहा.