दिव्यांगासाठी योजना : अतिशय फायदेशीर माहिती | संपुर्ण वाचा.

दिव्यांगासाठी योजना / उपक्रम : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव मिळवण्यासाठी काय निकष आहेत,याची संपुर्ण माहिती.

नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभाग सामान्यांसाठी,दिव्यांगासाठी विविध योजना / उपक्रम राबवत असते .अलीकडे च नाशिक महानगरपालिका दिव्यांगासाठी एक उपक्रम राबवत आहे त्याची संपुर्ण माहिती आता आपण पाहणार आहोत. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अल्मिको), मुंबई यांच्या मार्फत ADIP योजने अंतर्गत दिव्यांग व्यक्तीची पूर्व तपासणी करून त्यांना आवश्यकता असल्यास भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अल्मिको) यांचे मार्फत दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

हे ही वाचा : मागासवर्गीय शिक्षक संघटनेसह अनेक शिक्षक संघटनांचा सांगलीमध्ये विराट मोर्चा.

त्याकरीता तालुका निहाय तपासणी शिबिराच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ ते ९ नाव्हेंबर २०२३ या दरम्यान तालुका निहाय अल्मिको मुंबई यासंस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने वाटप करणेसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.

निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार नाशिक येथे दिनांक २६/१०/२०२३ रोजी लक्षिका मंगल कार्यालय, सिटी सेंटर मॉल समोर, लवाटे नगर, नाशिक या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.Plans for Disability : Very Useful Information | Read the whole.
हे ही वाचा : कंत्राटी भरती अखेर रद्द : देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

निकष

दिव्यांग व्यक्तीना कृत्रिम अवयव साहित्य मिळणेसाठी व सदर शिबिरामध्ये सहभाग नोंदविण्याकरीता खालीलप्रमाणे कागदपत्रे शिबिर स्थळी सादर करणे आवश्यक आहे.
१. किमान ४० % दिव्यांगत्व धारण करणेबाबत सक्षम प्राधिकारी यांचे दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र.

२. प्रतिमहा र.रु. २२,५००/- उत्पन्न (वार्षिक र.रु. २,७०,०००/-) चे सक्षम प्राधिकारी यांचे उत्पन्नाचा दाखला.
३. आधारकार्ड
४. एक पुर्ण फोटो (छोट्या साईज मध्ये) व पासपोर्ट आकाराचे २ फोटो,
५. UDID कार्ड
६. १० वी त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या १००% दृष्टी दोष असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ते शिक्षण घेत असल्याबाबत पुरावा सदर करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : लेक लाडकी योजना राज्यात मुलींना करणार लखपती ! मिळणार असे पैसे.
तरी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दिव्यांग व्यक्तींना आवाहन करण्यात येते की, ज्यांना सदर शिबिरामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या खाली नमुद ठिकाणी नांव नोंदणी करावी व शिबिराचे ठिकाणी लागणारे खालील प्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे तपासणी करुन घ्यावी.

नोंदणी ठिकाण,दिनांक,नोंदणी वेळ

संपुर्ण माहितीसाठी नाशिक महानगपालिका संकेतस्थळाच्या या निळ्या अक्षरावर क्लिक करा .

दिव्यांगासाठी योजना.

त्याचबरोबर दिनांक २६/१०/२०२३ रोजी लक्षिका मंगल कार्यालय, सिटी सेंटर मॉल समोर, लवाटे नगर, नाशिक या ठिकाणी अल्मिको मुंबई याचे मार्फत आयोजित केलेल्या शिबिराकरीता प्रत्यक्ष वरील प्रमाणे आवश्यकत्या मुळ कागदपत्र व त्याचे छायांकित प्रतिच्या एक संचासह उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहिती करीता नाशिक महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाशी दुरध्वनी क्र. ०२५२- २२२२४५४ यावर संपर्क साधवा.उप आयुक्त (समाज कल्याण) नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक निघाले आहे.

Leave a Comment