बेरोजगार दिव्यांगाना अर्थसहाय्य्य योजना | प्रतिमहिना रुपये 3 हजार | संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे,त्याचे पूर्ण वाचन करा.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगासाठी नाशिक महानगरपालिका समाजकल्याण विभागामार्फत अनेक योजना आहेत,त्यापैकी बेरोजगार दिव्यांगाना अर्थसहाय्य्य योजना ही एक योजना आहे.यामध्ये पात्र बेरोजगार दिव्यांगाना प्रतिमहिना रुपये 3 हजार इतके अर्थसहाय्य महानगरपालिका समाज कल्याण विभागाकडून मिळते.त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी कोणता अर्जाचा नमुना आहे तो आपण खाली लिंक मध्ये पाहणार आहोत. विशिष्ठ अटींची पूर्तता करणा-यांना या योजनेचा लाभ मिळतो.या अटी व शर्ती कोणत्या आहेत आता आपण पाहणार आहोत. Jobless Disability Financial Aid Scheme | Complete information
हेही वाचा: नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागात भरती | शेवटची तारीख.
अटी व शर्ती
१. महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करीत असलेबाबत पाणी बील, वीजबील, मालमत्ता कर पावती,वास्तव्याचा करारनामा, रेशनकार्ड यापैकी कोणतेही दोन पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
२. आधार कार्डची छायांकीत प्रत सादर करणे.
३. UDID कार्ड व ऑनलाईन प्रमाणपत्र याबाबतची छायांकीत प्रत सादर करणे.
४. जन्माचा दाखला अथवा वयाचा पुरावा याबाबतची छायांकीत प्रत सादर करणे.
५. पॅनकार्ड व बँकेच्या पासबुक ची छायांकीत प्रत सादर करणे.
६. वय वर्ष १८ व त्यापुढील दिव्यांग व्यक्तींना संपूर्ण हयातीत सदर योजने अंतर्गत जास्तीत जास्त १५ वर्ष लाभ घेता येईल.
७. सदर आर्थिक वर्षामधील योजनेचा लाभ मिळविणेकरीता अर्जदारास इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय तसेच मनपा मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग व इतर योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा घेणार नाही. तसेच नोकरी अथवा कोणताही रोजगार करत नसल्याबाबत घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. (नाशिक महानगरपालिकेच्या धोरणानुसार एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ देय असल्यास लाभ घेता येईल.)
हे ही वाचा : नाशिक महानगरपालिकेत भरती प्रक्रिया सुरू ! संपुर्ण माहिती
वयाची अट
८. दिव्यांग व्यक्तीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक राहील.
९. मतिमंद व बहुविकलांग व्यक्तींना प्रथमतः प्राधान्य देण्यात येईल.
१०. पात्र झालेल्या लाभाथ्यांनी प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये स्वतंत्रपणे हयातीचा दाखला / स्वयंघोषणापत्र आवश्यक त्या कागदपत्रासह माहे डिसेंबरमध्ये दर वर्षी सदर करणे बंधनकारक राहील. हयातीचा दाखला सादर न केल्यास अर्थसहाय्य थांबविणेत येईल.
हे ही वाचा : दिव्यांगासाठी योजना : अतिशय फायदेशीर माहिती | संपुर्ण वाचा
११. सदर योजनेकरीता कौटुंबिक उत्पन्नांची कमाल मर्यादा र.रु. ४,००,०००/- (अक्षरी र.रु. चार लक्ष मात्र ) इतके राहील. त्याकरीता अर्ज प्राप्त झाला त्या वर्षांच्या मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न दर्शविणारा तहसिलदार, नाशिक यांचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. ( सदरची अट दिनांक ए जानेवारी २०२४ पासून लागू राहील.) १२. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर परंतू संपूर्ण अर्ज व कागदपत्राची पुर्णतः पूर्तता केल्यास त्या पात्र अर्जदारास लाभ देण्यात येईल. (अपूर्ण कागदपत्र असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.)
१३. एखाद्या पात्र अर्जदारा संबंधित खोटे कागदपत्र जोडण्यात आले आहे.असे निदर्शनास आल्यास पात्र अर्ज,अपात्र करण्याचे किवा लाभार्थ्यावर कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार मा.आयुक्त मनपा यांना राहतील.
१४. सर्व छायांकीत प्रती स्वसाक्षांकीत करणे आवश्यक आहे.
१५. सदरचा अर्ज विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह रजिस्टर/ स्पीड पोस्टाने खालील नमूद पत्यावर सादर करणे बंधनकारक आहे. पोस्टाचा पत्ता : उप आयुक्त (समाज कल्याण) समाज कल्याण विभाग, नाशिक महानगरपालिका, तळ मजला, राजीव गांधी भवन, शरणपूररोड, नाशिक ४२२००२
संपुर्ण माहितीसाठी या निळ्या लिंक वर क्लिक करा