नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागात भरती | शेवटची तारीख.

नाशिक महानगरपालिका नाशिक, सार्वजनिक आरोग्य विभाग तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरील वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स

व ए.एम.एन भरती बाबत सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

हे ही वाचा : दिव्यांगासाठी योजना : अतिशय फायदेशीर माहिती | संपुर्ण वाचा

Table of Contents

खूप मोठ्या प्रतिक्षेनंतर नाशिक महानगपालिकेत भरतीची घोषणा केलेली आहे.नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत खालील पदे मानधन पध्दतीने भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. किमान शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह जाहिरात/संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करुन व्यवस्थित भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करुन मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी मनपाच्या नोटीस बोर्डवर तसेच मनपाच्या https:\nmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. मुलाखती अंती निवड उमेदवारांची यादी मनपाच्या नोटीसबोर्ड वर व मनपा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना स्वंतंत्ररित्या कळविणेत येणार नाही.
हे ही वाचा : नाशिक महानगरपालिकेत भरती प्रक्रिया सुरू ! संपुर्ण माहिती.

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण:-

सार्वजनिक वैद्यकिय विभाग, 3 रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक अर्ज कार्यालयीन सुट्टी व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी 10.00 ते 5.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख व वेळ :- 26/10/2023 सायं 5.00 वाजेपर्यंत.
टीप:- 26/10/2023 सायं 5.00 वाजेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागात भरती


पात्र उमेदवारांकरीता मुलाखतीची दिनांक व वेळ :-

दिनांक: 07/11/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता.
दिनांक: 08/11/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता.
मानधनावर भरावयाची पदे पदांची किमान शैक्षणिक अर्हता, संख्या व एकत्रित दरमहा मानधन खालीलप्रमाणे-

हे ही वाचा : दिव्यांगासाठी योजना : अतिशय फायदेशीर माहिती | संपुर्ण वाचा

अटी व शर्ती :-

 1. शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 3 वर्षाचा अनुभवास प्राधान्य. ( अनुभव प्रमाणपत्र आवश्यक)
 2. अ.क्र. 1 ते 11 पदांकरिता कमाल वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत राहील. वय वर्ष 60 नंतरच्या प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्स्क यांचेकडून शारिरीक दृष्टया पात्र असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक. व महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक.
 3. अ.क्र. 12 व 13 पदांकरिता कमाल वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत राहील व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण
  आवश्यक.
 4. सदरची निवड आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शक सुचना नुसार करण्यात येईल.
 5. सदरील पदांचा मनपा, नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
 6. सदरील पदे ही निव्वळ मानधनावर भरावयाची आहेत. सुरुवातीस निवड झालेल्या उमेदवारांना प्रथमतः 6 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कामाचे आदेश दिले जातील. तसेच त्यानंतर सदर उमेदवारांची आवश्यकता असल्यास सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पुढील कामाचे आदेश दिले जातील.
 7. मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रे व सर्व प्रमाणपत्रांची साक्षांकित सत्यप्रतींसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे.
  पासपोर्ट साईज फोटो-2, वयाच्या दाखल्याकरीता :- 10 वीचे टी.सी./जन्म प्रमाणपत्र, फोटो आय.डी. मतदान ओळखपत्र/आधारकार्ड इ. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र:- शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र, सदर नोंदणीचे नुतनीकरण पत्र डिग्री सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र, मुलाखतीच्या अनुषंगाने इतर कागदपत्रे मुळ व सत्यप्रत साक्षांकित प्रत.
 8. अर्ज छाननी अंती पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येईल.
 9. अ.क्र. 1 ते 11 पदांकरिता पात्रतेसाठी एकूण 100 गुण असतील व त्यांची विभागणी खालीलप्रमाणे असेल
 10. अधिक माहितीसाठी या निळ्या ओळीवर क्लिक करा आणि सर्व माहिती पहा.
 1. उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार यांना प्राधान्य देणेत येईल.
 2. उमेदवारांचे अर्ज जास्त संख्येने असल्यास 1:3 याप्रमाणे उमेदवार बोलविण्यात येतील.
 3. उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
 4. नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकार आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी राखून ठेवला आहे.

Leave a Comment