राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिकेत भरती प्रक्रिया माहिती सविस्तर पाहुया.
Table of Contents
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिकेत भरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने करण्यात येत आहे. याची जाहिरात नुकतीच निघाली आहे. पदाचे नाव, किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता, कोणत्या ठिकाणी नेमणूक आहे, मानधन किती आहे, याची संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.
पात्र उमेदवारा मधून निवड प्रक्रिया खालील प्रमाणे राबवण्यात येईल.
हे ही वाचा : दिव्यांगासाठी योजना : अतिशय फायदेशीर माहिती | संपुर्ण वाचा.
अटी व शर्ती:-
1) वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन दि. 29-06-2024 रोजी पर्यंतच्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. पुढील पुर्ननियुक्ती ( ११ महिने २९ दिवसाच्या कालावधीकरीता) आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधारीत असेल. शासनाने सदर पदे नामंजुर केल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल.
2) पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
3) अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
4) वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत. सदर पदावर कायमचा हक्क राहणार नाही तसेच या पदासाठी अर्जदाराला शासकिय नियमित सेवेत सामावुन घेण किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबधि दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
5) जाहिरातीतील रिक्त पदाच्या संख्येत बदल होऊ शकतो तसेच रिक्त ठिकाणांमध्ये बदल होऊ शकतो. याबाबतचे सर्व अधिकार मा. आयुक्त तथा प्रशासक, नाशिक महानगरपालिका यांनी राखुन ठेवले आहेत.
6) अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिला जाईल.
7) एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवाराने प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
8) एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करताना, अर्जसोबत पदांचा प्राधान्यक्रम मुलाखतीच्या पुर्वी कार्यालयास सादर करावा
9) निवड यादीतील गुणक्रमांकाचे आधारे प्राधान्यक्रम पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवारांनी कुठल्याही दबावतंत्राचा वापर कल्यास सदर उमेदवाराची निवड रदद करण्यात होईल.
10) जाहिरीतीच्या दिवशी सदर पदासाठी कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय करीता ४३ वर्षे राहील. वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) व विशेषज्ञ, अतिविशेषज्ञ यांची सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा ७० वर्ष राहील. ६० वर्षावरील अर्जदारांकरीता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारिरीक योग्यता (Physical Fitness) चे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. वय वर्ष ६० नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडुन शारीरीकदृष्टा सक्षम असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतरच नियुक्ति आदेश देण्यात येईल.
11) विशेषतज्ञ / अधिकारी या पदाकरीता शासकिय सेवेतुन सेवानिवृत्त स्वेच्छा सेवानिवृत्ती विशेषतज्ञ अधिकारी या पदाकरीता अर्ज करीत असल्यास शासकिय सेवेत रुजु झालेला दिनांक, कार्यकाळ, पदनाम व निवृत्त झालेले वर्ष, सेवा निवृत्तीच्या दिनांकास मिळालेले अंतिम वेतन व सेवा निवृत्ती नंतर देय असलेले वेतन (पेन्शन) याबाबतची संपुर्ण माहिती अर्जामध्ये नमुद करावी.
12) शासकीय कर्मचारी यांच्या पुर्वीच्या शासकीय कर्मचारी कार्यकाळात कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हयाची नोंद नसावी किंवा झालेली नसावी. सेवा निवृत्त विशेषतज्ञ यांचे निवड झाल्यास सदर पदांकरीता मानधन राज्यस्तरीय विविध मार्गदर्शक सुचनानुसार मोजमाप करुन अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
13) अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही. 14) उपरोक्त सर्व पदांकरीता तत्सम कौंसिल रजिष्ट्रेशनचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील. अन्यथा उमेदवारांस मुलाखतीस अपात्र ठरविले जाईल.
15 ) भरती प्रक्रियेच संपूर्ण अधिकार पदे कमी-जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे, इत्यादी सर्व अधिकार है या कार्यालयाचे असून निवड प्रकियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी राखुन ठेवलेले आहेत. याबाबत कोणालाही दावा करता येणार नाही.
16) इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित सत्य प्रतिसह उदा. वयाचा पुरावा, पदवी / पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र) गुणपत्रिका शासकीय / निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव व मोबाईल क्र.सह जोडण्यात यावे. अनुभव संबंधित कामाचा असावा जात वैधता प्रमाणपत्र इ. छायांकित प्रतींसह दि. 20/10/2023 ते 31/10/2023 (शासकिय सुट्टी वगळता ) या कालावधीत सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. तसेच रिक्त पदांकरीता दरमहा 2 रा व 4 था मंगळवारी वेळ 11 ते दुपारी 2 या दरम्यान थेट मुलाखत सर्व पदांची भरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यत राबविण्यात येईल. 17 ) मुलाखतीकरीता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता अथवा इतर कोठलाही भत्ता देय राहणार नाही.
18) खुल्या प्रवर्गातील पदाकरीता रु.१५०/- व राखिव प्रवर्गातील पदाकरीता रु.१००/- चा डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे.
व डिमांड ड्राफट च्या मागे स्वतःचे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे, सदरचा डिमांड ड्राफट NASHIK MUNICIPAL CORPORATION INTEGRETED HEALTH & FAMILY WELFARE SOCIETY ” या नावे असावा. कोणत्याही कारणास्तव डिमांड ड्राफट बँकेत न वठल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल….
19) सदरहु पदभरती करीता अर्ज छाननी, मुलाखत प्रक्रिया, निवडयादी प्रसिध्द करणे, हरकती / आक्षेप प्राप्त करुन घेणे व त्या निकाली काढणे आदि रितसर शासनाच्या तसेच राष्ट्रिय आरोग्य अभियानाकडील प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार भरती प्रक्रिया पार पाडुन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ति आदेश देणे इ. बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी www.nmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारांना वैयक्तिक स्वरुपात कळविण्यात येणार नाही. उमेदवारांनी वेळोवेळी भरतीप्रक्रियेची माहिती ही वर नमुद संकेत स्थळावर तपासावे.
20) सदर भरतीची प्रक्रिया पुर्ण झालेनंतर भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिलेमुळे जागा रिक्त
झालेस प्रतिक्षा यादीवरील उमेदवारास नविन भरती प्रक्रिया न करता नियुक्ती आदेश दिले जातील.
21) लहान कुटुंबाची अट दि. २३/०७/२०२० पासून लागु करण्यात आली असून दि. २३/०७/२०२० पासून दोनपेक्षा अधिक
हयात मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत. 22) अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते
भरतीप्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
23) अर्जाचा नमुना हा जाहिरातीसोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
(24) उमेदवारांचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही.
25) निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्याबाबत रु.१००/- बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल.
26) निवड झालेल्या उमेदवारांना कार्यरत नव्याने कार्यान्वित होणाया शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र प्रमाणे नियुक्ती आदेश देण्यात येतील. नियुक्ति आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांमध्ये नियुक्तीचे ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा
त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षायादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल.
संपुर्ण जाहिरात पाहण्यसाठी या निळ्या ओळीवर क्लिक करा.