राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा 2024 या बाबत सविस्तर महत्त्वाची माहिती
Table of Contents
छत्रपती राजाराम महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित केंद्रस्तर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी “राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा 2024” आयोजित करण्यात आली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कर्तृत्वसंपन्न कारकीर्द हो महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व ठरली आहे. सूख विलासाची सर्व साधने पायी घोटाळत असताना कोल्हापूर संस्थानाच्या शाहू महाराजांनी उपभोगशून्य स्वामित्त्व गाजविले. सत्तेचे साधन हाती ठेवून प्रजेचा उत्कर्ष घडविण्यासाठी त्यांनी महत् प्रयास केले. जनतेच्या सर्वांगीण उन्नत्तीचे त्यांनी स्वप्न पाहिले व ते साकार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले.
हे ही वाचा: महाज्योती योजने मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा कसा मिळवाल |
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाची उन्नती करावी, यासाठी सारथी संस्थेमार्फत प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यासाठी “राजर्षी शाहू महाराज केंद्रस्तरीय निबंधस्पर्धा 2024” आयोजित करण्यात येत आहे. सारथी सस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सदर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. इ. 3 री ते 5 वी तसेच इ. 6 वी ते इ. 7 वी व 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.
केंद्रस्तरीय निबंधस्पर्धा विषय, नियम व अटी
गट क्र. 1 :- इयत्ता 3 री ते इयत्ता 5 वी
विषयः- अ) राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण,
व) राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग. शब्द मर्यादाः 100 शब्द
गट क्र.2:- इयत्ता 6 वी ते इयत्ता 7 वी
विषयः – अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडाविषयक कार्य.
व) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य. शब्द मर्यादाः 300 शब्द
गट क्र.3:- इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी
विषयः- अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि वसतीगृह चळवळ,
व) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य.
शब्द मर्यादा:- 500 शब्द
हे ही वाचा: 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता कर्मचाऱ्यांना मिळणार
केंद्रप्रमुख यांनी निबंधस्पर्धा संपन्न होताच स्पर्धेविषयी आपल्या अधिनस्त असलेल्या केंद्राचा संक्षिप्त अहवाल निकाल पत्रकासोबत पुढील नमुन्यात या कार्यालयाकडे सादर करावा. तसेच सदर स्पर्धेविषयी आपला अभिप्राय सुमारे 10 ओळीत सही शिक्यासह सादर करावा.राजर्षी शाहू महाराज निवंधस्पर्धा 2024 आयोजनाची दि. 15 जुलै 2024 ते 30 ऑगस्ट 2024 ही आहे. या कालावधीत निबंध स्पर्धेचे आयोजन केंद्रस्तरावर केंद्रप्रमुख यांनी करावे.
छत्रपती शाहू महाराजांचा विचार व कार्य सर्व विद्याथ्यांना आत्मसात व्हावे यासाठी आपल्या केंद्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना निबंधस्पर्धेत सहभागी करून घ्यावे म्हणून निबंध स्पर्धेत केंद्रस्तरावर घेण्यात यावी.राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा 2024 ही स्पर्धा मनपा क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या सर्व मान्यताप्राप्त शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावी.. निबंध लेखन स्पर्धाचे माध्यम मराठी असेल.
विद्यार्थ्यांनी स्वतः शिकत असलेल्या इयत्तानिहाय गटातून एकाच विषयावर स्वतः निबंध लिहावा निबंधावर विद्यार्थ्यांचे स्वतःचे नाव, इयता, शाळेचे नाव व निबंधाचा विषय नमूद करावा, तसेच निबंधाच्या शेवटी शब्द संख्या नमूद करावी.
हे ही वाचा: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचा लाभ घेण्यासाठी आवशयक माहिती !
प्रत्येक केंद्रातील निबंध स्पर्धेत. सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे निबंध केंद्रस्तरावर केंद्रप्रमुखांनी एकत्रित करावेत व तद्नंतर सदर निबंध केंद्रांच्या लेटर हेडवर केंद्रप्रमुखांच्या शिफारशीने व सही शिक्क्यानिशी सदर निबंध या कार्यालयाकडे दिनांक 1 सप्टेबर 2024 पर्यंत सादर करावेत. निबंध स्पर्धेत 1 ते 3 गटातील विजेत्या 1 ते 3 क्रमांकाचे निबंध या कार्यालयात जमा करावे.
केंद्र स्तरावरील निबंध स्पर्धेच्या प्रत्येक गटासाठी केंद्रप्रमुख यांनी तीन तज्ञ परीक्षक शेजारच्या केंद्रातील नियुक्त करावेत, त्यांचेकडून निबंध स्पर्धेचे परीक्षण करून 1 ते 3 क्रमांक घोषित करावेत. निबंध स्पर्धेचे परीक्षण आशय- 25 गुण, अभिव्यक्ती – 5 गुण, भाषाशैली-5 गुण, शुद्धलेखन- 5 गुण, वळणदार हस्ताक्षर व प्रभाव 10 गुण एकूण 50 गुणांच्या आधारे मूल्यमापन करावे.
निबंध स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या तिन्ही गटातील प्रत्येकी गुणानुक्रमे 1 ते 3 विद्यार्थ्यांची यादी या कार्यालयास दि. 30/08/2024 (त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नांव, शाळेचे नांव व पत्ता, ई-मेल, स्पर्धेचा विषय, प्राप्त क्रमांक, विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक, बैंक तपशील, नांव, खाते क्रमांक, IFSC Code, बँकेचे नांव, शाखा इ. माहिती सादर करावी.) तसेच 1 ते 3 गटातील विजेत्या 1 ते 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे निबंध या कार्यालयास सादर करावेत.