धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचा लाभ घेण्यासाठी आवशयक माहिती !

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचा लाभ कसा घ्यावा ! या विषयी सविस्तर माहिती

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता शासकीय वसतिगृहामध्ये प्रेवशाकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करणेबाबतची बातमी महाविद्यालयाचे दर्शनी भागावर प्रदर्शित भागावर प्रदर्शित करण्याच्या सूचना राज्यस्तरावरून देण्यात आल्या आहेत.

राज्यातील विविध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी विभागाप्रमाणे धनगर समाजातील विद्याथ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय योजना सन २०१९ पासून लागू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आपणांस सुचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या व शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनाकडून नमुद योजनेसाठी अर्ज भरुन घ्यावेत व सदरचे परिपूर्ण अर्ज ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत या कार्यालयाकडे सादर करण्याची दक्षता घ्यावी.

हे ही वाचा: महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना काय आहे सविस्तर !

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे निकष असतील.

अ) मुलभूत पात्रता

१) विद्यार्थी धनगर समाजातील असावा.

२) धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

३ ) विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा जास्त नसावे, तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.

४) विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील.

५) विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातं. सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

६) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचे कमाल वय २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

हे ही वाचा: सर्वेक्षण : राज्यात 5 जुलै पासून शाळाबाहय बालकांचे,शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी सर्वेक्षण.

ब) शैक्षणिक निकष

X. सदरचा विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.

XI. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60% गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील.

XII. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती करीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि, दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

XIII. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदच्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस या योजनेचा लाग अनुज्ञेय राहणार नाही.

XIV. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात / संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.

XV. योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा.

XVI. योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती 60% असणे बंधनकारक राहील. तथापि, एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा.

XVII. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल.

XVIII. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहिल मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या धर्तीवर, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विदयार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यास संदर्भाधिन वाचा क्र.०३ येथे नमुद दि.०६.०९.२०१९ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

२. मा. मंत्रीमंडळाच्या दि.१९.१०.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे, वसतिगृहाच्या लाभापासून वंचित असलेल्या विदयार्थ्यांकरिता लागू असलेल्या विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्याबाबतचा निर्णय संदर्भाधिन क्र.०४ येथे नमुद दि.३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे.

३. सदर शासन निर्णयातील निदेश लक्षात घेवून या विभागाच्या दि.०६.०९.२०१९ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या “पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना या योजनेकरिता निश्चित केलेल्या निकषामध्ये एकसमानता यावी याकरिता सुधारित प्रस्ताव मा.अ.मु.स (वित्त) यांचे अध्यक्षतेखाली दि.०५.०४.२०२४ रोजी आयोजित बैठकीमध्ये सादर करण्यात आला.

सदर बैठकीमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरीता स्वयंम योजनेच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेले निकष हे विभागाने अर्थसंकल्पीय तरतुद विचारात घेऊन सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केलेल्या दि.३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विभागाच्या स्तरावर अंतिम करावेत असा निर्णय घेण्यात आला आहे.

४. त्यानुसार, वसतिगृहाच्या लाभापासून वंचित असलेल्या विदयार्थ्यांकरिता विविध विभागामार्फत सुरू असलेल्या योजनेमधील निकष विचारात घेवून या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या – पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेच्या निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यानुषंगाने, या विभागाचा संदर्भाधिन क्र.३ येथे नमुद दि.६/९/२०१९ चा शासन निर्णय अधिक्रमित करून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या परंतु, शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

सदर योजनेंतर्गत प्रती जिल्हा ६०० याप्रमाणे एकूण २१,६०० विदयार्थ्यांना प्रति वर्षी लाभ देण्यात येईल. त्याकरिता लाभार्थ्यांनी संबंधित जिल्हयातील सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांचेकडे ऑनलाईन / ऑफलाईन स्वरूपात अर्ज करावा. सदरहू योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार, पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येईल.

२) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे निकष विहित करण्यात येत आहेत

अ) मुलभूत पात्रता

१. विद्यार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचा असावा.

२. विदयार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा.

३. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

४. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला भटक्या जमाती-क प्रवर्गाचा जातीचा दाखला/ तसेच भटक्या जमाती-क प्रवर्गाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिले वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

५. अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे.

६.दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त ६ दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

७. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षीक उत्पन्न मर्यादा लागू राहील.

८. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बैंक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील.

९. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

ब) शैक्षणिक निकष

१. सदरचा विद्यार्थी १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.

२. व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPAचे गुण असणे आवश्यक राहील. जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यानंतर, इयत्ता १२ वी मध्ये प्राप्त गुणांची टक्केवारी विचारात घेतली जावी.

३. सदर योजनेंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या ७० टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी व ३० टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी असतील.

४. या योजनेंतर्गत निवड केलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील.

५. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती करीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि, दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

६. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात/संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.

७. योजनेंतर्गत, तालुकास्तरावर लाभ मंजूर करण्यासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्याने इ. १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा.

८. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

९. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

१०. योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान ७५% असावी. तथापि, एखाद्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण विभाग कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा.

इतर निकष

१. योजनेचा लाभ १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ५ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. परंतु, इंजीनिअरिंग / वैदयकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त ६ वर्ष राहील.
२. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.
३. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही स्वयंम योजनेंतर्गत लाभास पात्र असेल.
४. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी स्वयंम योजनेंतर्गत लाभास पात्र असेल. तथापि, सदर विद्यार्थी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा.
५. सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील. तथापि, उपरोक्त ५ वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधींची गणना करण्यात येईल.

६. सदर योजनेतंर्गत, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विदयार्थ्यांना, व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विदयार्थ्यांना, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विदयार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विदयार्थ्यांना अशा रितीने प्रति जिल्हा ६०० विदयार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. तदनंतर, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश देय राहिल. ज्या पदविका अभ्यासक्रम उर्तीर्ण विदयार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या व्दितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास व्दितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील. उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. त्यासाठी त्या-त्या वेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांचेकडे सोबत जोडलेल्या विहित विवरणपत्रात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक

७.न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. तसेच, ज्या विद्यार्थ्यांस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आधार योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे त्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वयंम योजनेचा लाभ अनुज्ञेय नसेल.
८. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
९. सदर योजनेंतर्गत महिलांसाठी ३० टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित
करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय असेल.
१०. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे, शिक्षण न घेता नोकरी / व्यवसाय करुन या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यावर देखील
असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल.

११. या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४% आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे असेल, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा ५०% इतकी राहील, व यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी)
२. स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत)
३. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
४. भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडेपत्र करारपत्र.
५. महाविदयालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.
६. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असल्याचा पुरावा (वसतिगृहाच्या गृहपालांच्या साक्षांकित प्रतीसह)

निवड प्रकिया

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यांनी संबंधित जिल्हयातील सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांचेकडे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात अर्ज सादर करावेत.
सहायक संचालक हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांचेशी संलग्न (attach) करतील.
पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधीत सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांनी संचालक, इतर मागास बहूजन कल्याण संचालनालय, म.रा. पुणे यांच्याकडे विद्यार्थ्यांना अनुदान वितरणासाठी Forward करावेत.
संचालक, इतर मागास बहूजन कल्याण संचालनालय, पुणे यांनी पात्र विद्यार्थ्यांना अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.

अनुदान वितरण

सदर योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अनुदान वितरण करण्यात यावे :- योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेली भोजन, निवास व निर्वाहभत्त्याची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या
आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ जमा करण्यात
यावी.
सदर योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्याकरिता खालील तक्यात नमूदप्रमाणे वेळापत्रक ठरविण्यात येत आहे.

उक्त तक्यात नमुद वेळापत्रक हे जरी १२ महिन्यांचा कालावधी दर्शवित असले तरी, प्रस्तुत योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यास एका शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांचा कालावधीसाठी लाभ अनुज्ञेय राहील. सदर १० महिन्यांचा लाभ निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हयाचे सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांची राहील. तथापि, लाभाची रक्कम जमा करताना प्रत्येक तिमाहीमध्ये देय असलेली अनुज्ञेय रक्कम संबंधित विदयार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. विदयार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल. या योजनेत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांस इतर कोणताही भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. ✓ विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५ % असणे आवश्यक राहील, याबाबत संबंधित संस्थेकडून प्रत्येक तिमाहीस उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याने प्रत्येक सत्र परिक्षेचा निकाल १५ दिवसाचे आत देणे बंधनकारक राहील.

संनियंत्रण

सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण हे जबाबदार राहतील तसेच संबंधित जिल्हयातील वसतिगृहाचे गृहपाल यांचे संनियंत्रण राहील. सदर योजनेची राज्यस्तरावरील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याची जबाबदारी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांची राहील.

विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ संबंधित अभ्यासक्रमाच्या कालावधीपर्यंतच देय असेल. (उदा. इंजिनिअरींग अभ्यासक्रम कालावधी ४ वर्षे असल्यास त्यास ४ वर्षेच लाभ मिळेल) विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रकमेची १२% व्याजासह वसुली केली जाईल.

सदर योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या विदयार्थ्यांना पदवी/पदव्युत्तर पदवी हे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना एटीकेटी प्राप्त झाली त्या विदयार्थ्यांला फक्त एकदाच या अटीतून सुट देण्यात येईल. (म्हणजेच एखादया विदयार्थ्यांस दुसऱ्यावेळी एटीकेटी मिळाल्यास तो सदर योजनेचा पुढील लाभ घेण्यास अपात्र ठरेल.

विद्यार्थ्याने संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेअंर्गत अनुज्ञेय रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगावू देण्यात येईल व त्यानंतर शैक्षणिक संस्थेच्या प्रत्येक तिमाहीची हजेरी ७५ % पेक्षा जास्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उर्वरीत तिमाहीची रक्कम अदा केली जाईल. ही अदा करण्यात येणारी रक्कम आधार संलग्न बैंक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

सर्व प्रादेशिक उप संचालक (इतर मागास बहूजन कल्याण) हे त्यांच्या अधिनस्त प्रादेशिक विभागातील सर्व जिल्हयाच्या सहायक संचालक, (इतर मागास बहूजन कल्याण) यांच्या सहाय्याने सदर योजनेचा मासिक आढावा घेतील.
सदर योजनेचे अटी व शर्ती वेळोवेळी आवश्यक वाटल्यास सुधारीत करण्याचे अधिकार शासनास राहतील.

भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना ही योजना राबविल्यामुळे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यास हातभार लागणार आहे.

सदर योजनेच्या अंमलबजाणीसाठी होणारा खर्च मागणी क्र. झेडजी-३, २२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, ०३, मागासवर्गीयांचे कल्याण, २७७, शिक्षण, ०२, शिष्यवृत्त्या विद्यावेतन, (०२) (२३) वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विदयार्थ्यांकरिता स्वयंम योजना (कार्यक्रम) (२२२५ एफ ४१४) ३४, शिष्यवृत्त्या/विदद्यावेतने- या लेखाशिर्षाखाली उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०६२११७२२३५३६३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Leave a Comment