सर्वेक्षण : राज्यात 5 जुलै पासून शाळाबाहय बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी सर्वेक्षण या विषयी सविस्तर माहिती
Table of Contents
शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दि. 5 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत परिपत्रक शासनाने नुकतेच काढलेले आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, राज्यात दि. 1 एप्रिल 2010 रोजी कार्यान्वित झाला आहे. सदर कायद्यांतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. शाळेत कधीही दाखल न झालेली तसेच शाळेत न जाणारी बालके ज्यांनी शाळेत प्रवेश घेतला नाही किंवा ज्या बालकांनी शाळेत प्रवेश घेतला नाही. अशा 6 ते 14 वयोगटातील राज्यात आजही अनेक बालके विविध कारणांमुळे शाळाबाहय आहेत.
हे ही वाचा: नाशिक मनपा शाळेमध्ये डेंगू,मलेरिया,चिकन गुनिया रोग जनजागरण मोहिम राबविणार
नाशिक जिल्हयात अनेक तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात रोजगारानिमित्त कुटुंब स्थलांतरीत करीत असतात. स्थलांतराचा कालावधी हा माहे ऑक्टोंबर ते एप्रिल असा साधारणतः सहा महिन्यांचा असतो. ऊस तोडणी बरोबरच वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजूरी, कांदाचाळ, डाळींब व द्राक्षेबाग, बांधकाम व्यवसाय, सार्वजनिक बांधकामांतर्गत रस्ते व नाले दुरुस्ती व बांधकाम, जिनिंग मिल इ. अनेक प्रकारच्या कामांसाठी ही कुटुंबे स्थलांतर करीत असतात.
सदर कुटुंबासोबत शाळेत जाणारी मुले स्थलांतर करीत असल्यामुळे 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीतील अनुपस्थितीमुळे बालके शिक्षणापासून वंचित राहतात, परिणामी मुले शाळा सोडून आपल्या आई वडिलांना रोजगारात व कामात मदत करतात. वाढत्या स्थलांतरामुळे बालके शाळाबाहय होत आहेत. तसेच बालमजूरी व बालविवाहाचे प्रमाण रोखण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे शाळाबाहय स्थलांतरीत व शाळेत अनियमित असलेल्या बालकांचे शोध मोहिम राबविण्याचा निर्णय उपरोक्त संदर्भान्वये शासनाने घेतलेला आहे.
हे ही वाचा: International Yoga day : नाशिक मनपा शाळांमध्ये योगदिन मोठ्या उत्साहात साजरा.
त्यामध्ये खालीलप्रमाणे निर्णय झालेला आहे. राज्यात शाळाबाहय अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दि. 5 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 या कालावधीमध्ये सर्वेक्षण हाती घेण्याचे शासनाच्या सूचना आहेत. या महत्वपुर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास योजना, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक
विकास आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिका-यांच्या सहभागाने राबविण्याबाबत शासनाने कळविलेले आहे. संदर्भिय पत्रातील SOP मध्ये खालीलप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.
1) सर्वेक्षण कोठे करावे: सदर सर्वेक्षण कालावधीमध्ये शाळाबाहय अनियमित व स्थलांतरीत बालकांच्या नोंदी घरोघरी, प्रत्येक गावात, शहरात, गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्टेशन, बस स्थानके, बाजार, गुहाळ, घर, गावाबाहेरीच पाल, विटभट्ट्या, दगडखाण, मोठी बांधकामे, स्थलांतरीत कुटुंबे, झोपडया, फुटपाथ, सिग्नलवर, रेल्वेमध्ये, फुले व अन्य वस्तु विकणारी तसेच रस्त्यावर भिक मागणारी बालके, लोक कलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, भटक्या जमाती, तेंदुपत्ता वेचणारी, विडया वळणारी इविविध ठिकाणी काम. करणारे बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळ्यांवरील आणि जंगलातील वास्तव्य असलेल्या पालकांची बालके, मागास वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील मुले यांची माहिती या शोध मोहिमेत घेण्यात यावी.महिला बालविकासांतर्गत बालगृह निरीक्षण गृह विशेष दत्तक संस्था येथील मुलांमुलींचाही
हे ही वाचा: पायाभूत चाचणी परीक्षा : नवीन शैक्षणिक वर्षात,संपूर्ण वेळापत्रकासह पहा
1 ) या शोध मोहिमेत समावेश करण्यात यावा स्थलांतरीत मूल शिक्षणापासून वंचित राहणार / एकही शाळाबाहय. नाही यादृष्टीने नियोजन करण्याची दक्षताकेंद्रप्रमुख / मुख्याध्यापक यांनी घ्याव्यात.
2) शोध मोहिम जबाबदारी: केंद्रप्रमुखअंगणवाडी सेविका व मदतनीस यां, शिक्षक, मुख्याध्यापक, ची जबाबदारी राहील.
3) मोहिमेची अंमलबजावणी :- तालुकास्तरावरील अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या मदतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, यांच्या मार्फत 3 ते 18 वयोगटातील बालकांची शोध मोहिम पुर्ण करतील, सर्वेक्षण दि.5 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 या कालावधीत करावयाचे असून संदर्भित पत्रात नमूद केल्याप्रमाणे सर्वेक्षण यशस्वीरित्या पुर्ण होणसाठी सर्वेक्षणाला व्यापक जनप्रबोधन प्रसिध्दी, प्रचार, करण्यात यावे त्याकरीता संनियंत्राणासाठी विविध स्तरावर समित्या गठन करण्यात आलेले आहे.
वरीलप्रमाणे विविध स्तरावर समित्या तात्काळ गठीत करून समिती अध्यक्ष व सदस्य सचिव यांचे सर्वेक्षणाच्या समन्वयाची जबाबदारी राहणार आहे. सोबत संदर्भिय पत्रान्वये प्राप्त SOP पाठविण्यात येत असून SOP मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे तंतोतंत पालन करून दि. 5 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 या कालावधीत सदरचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात यावे.
सर्व संबधित कर्मचाऱ्यानी जबाबदारीपूर्वक काम करून शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांचे विहित प्रपत्रात भरलेल्या माहितीची पडताळणी व संगणकीकरण करून अहवाल प्रपत्र अ, ब, क व ड मध्ये दिलेल्या मुदतीत केंद्रप्रमुख यांच्या मार्फत दररोज सायं. ०५:०० वाजे पावेतो या कार्यालयास सादर करण्यात यावा.
सोबत :- शिक्षण संचालनालयाकडून प्राप्त प्रपत्र व सोबतच्या SOP जोडलेले आहे.