नाशिक मनपा शाळेमध्ये डेंगू,मलेरिया,चिकन गुनिया रोग जनजागरण मोहिम राबविणार

नाशिक मनपा शाळेमध्ये डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया रोग जनजागरण मोहिम राबविणार या विषयी सविस्तर माहिती

मनपा नाशिक कार्यक्षेत्रातील डास, डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया रोग यांच्या प्रतिबंधात्मक उपयायोजने बाबत आपल्या नाशिक मनपाच्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जनजागृती करण्यात यावी असे नाशिक मनपा शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे. आपल्या शाळेमध्ये डास व रोग प्रतिबंध बाबत वि‌द्यार्थ्यांची प्रतिज्ञा घेण्यात यावी, शाळेच्या परिसरात डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया रोग जनजागृती करणेसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात यावे. या जनजागृती कार्यक्रमासाठी मनपाच्या विभागीय कार्यालयीन कर्मचारी यांचा सहभाग घ्यावा असे ही त्या परिपत्रकात म्हंटले आहे. त्यांची यादी सोबत जोडली आहे. तसेच पत्रा सोबत शाळेत घ्यावयाची प्रतिज्ञा जोडली गेलेली आहे.

हे ही वाचा: International Yoga day : नाशिक मनपा शाळांमध्ये योगदिन मोठ्या उत्साहात साजरा.

तरी सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी सदर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून सदरच्या जनजागृती कार्याक्रमाचा अहवाल फोटोसह शिक्षण विभाग कार्यालयास दिनांक ३० जून २०२४ रोजी सादर करावा असे नाशिक मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे.

नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक आरोग्य (मलेरिया) विभाग

डास प्रतिबंधात्मक कारवाई व गप्पीमासे पुरवठा करीता खालील प्रमाणे मनपा कायम कर्मचारी व पेस्ट कंट्रोल कंत्राटी कर्मचारी यांची नावे.

हे ही वाचा: International Yoga day : नाशिक मनपा शाळांमध्ये योगदिन मोठ्या उत्साहात साजरा.

Leave a Comment