International Yoga day : नाशिक मनपा शाळांमध्ये योगदिन मोठ्या उत्साहात साजरा.

International Yoga day : नाशिक मनपा शाळांमध्ये योगदिन मोठ्या उत्साहात साजरा याबाबत सविस्तर माहिती.

नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये काल 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga day) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळा मधील सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

हे ही वाचा : पुदिना : आरोग्यासाठी एक वरदान, जेवणाची फायदे यावर सविस्तर माहिती

जागतिक आंतरराष्ट्रीय दिन हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात येत असतात, आयोजित करण्यात येत असतात. उपक्रमांची यादी ही अगोदरच निश्चित करण्यात येत असते. त्यानुसार काल सर्व शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दिनाला सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आणि हा उपक्रम पार पाडला.

21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. योग सुद्धा मानवाला आयुष्य मोठे करण्यासाठी उपयुक्त असतो. याचीच सांगड घालून आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी निश्चित करण्यात आला असावा असे बोलले जाते.
11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेत 177 सदस्यांच्या प्रस्तावाला या दिवशी मंजुरी देण्यात आली.

हे ही वाचा : दहावीनंतर करा हे कोर्स होईल लाखोंची कमाई

आंतरराष्ट्रीय योग दिनाला नाशिक महानगरपालिका शाळाच्या विद्यार्थ्यांना शाळांमधून योग दिनाबाबत पूर्व कल्पना देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थी संपूर्ण तयारीनिशी शाळेत उपस्थित होते.महानगरपालिका शाळा क्रमांक २२ ध्रुवनगर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला.विद्यार्थ्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. योग दिनाचे महत्त्व शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. योग केल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात. याविषयी सविस्तर मार्गदर्शन उपशिक्षक ईश्वर चौरे यांनी विद्यार्थ्यांना केले.

हे ही वाचा : पायाभूत चाचणी परीक्षा : नवीन शैक्षणिक वर्षात,संपूर्ण वेळापत्रकासह पहा.

सकाळ सत्र आणि दुपार सत्र वर्ग एकत्र घेऊन दोन्ही सत्रात समन्वय साधून या कार्यक्रमाचे आयोजन मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुव नगर मध्ये करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी विविध योगासने यामध्ये केली. ध्रुवनगरच्या मनपा शाळेत योगशिक्षक म्हणून ईश्वर चौरे यांनी काम केले.या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी,उपशिक्षिका लता सोनवणे,कल्पना पवार,दिपाली काळे उपशिक्षक नामदेव जानकर,संतोष महाले,ईश्वर चौरे इत्यादी उपस्थित होते.
योग दिनाच्या (International Yoga day) कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेले होते.

Leave a Comment