Career : दहावीनंतर करा हे कोर्स होईल लाखोंची कमाई !

career: दहावीनंतर करा हे कोर्स होईल लाखोंची कमाई ! या विषयी सविस्तर माहिती

सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी. दहावीनंतर खऱ्या आयुष्याची सुरुवात होते, पण दहावी नंतर काय करावे हे अनेक मुलांना कळत नाही.त्यांना दहावीनंतर (Career) अशी नोकरी करायची असते, ज्यामुळे त्यांना खूप पैसे कमवता येतील. दहावीनंतर काय करायचे? हा मोठा प्रश्न तुमच्या समोर निर्माण होत असतो आणि आज याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. दहावी नंतर पुढील कोर्स केले तर तुम्हाला हे खूप फायदेशीर ठरू शकते.

हे ही वाचा: पुदिना : आरोग्यासाठी एक वरदान, जेवणाची फायदे यावर सविस्तर माहिती

डिप्लोमा इन इंजीनियरिंग

दहावीनंतर विद्यार्थी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग करू शकतात. देशभरातील अनेक संस्थांमध्ये हा कोर्स तुम्हाला करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आवडत असेल, त्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यसाठी खूप चांगला वाव आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार आठ लाखापर्यंत वेतन मिळू शकते.

डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग

ज्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग मध्ये आवड आहे, ते विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. या कोर्समध्ये तुम्ही एसइओ, पेपर-क्लिक, जाहिरात, सोशल मीडिया मार्केटिंग आणि ईमेल मार्केटिंग हे शिकू शकता. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 50 हजार ते 1.5 लाखापर्यंतचा खर्च होऊ शकतो. या कोर्स नंतर तुम्हाला सुरुवातीचा पगार 3 लाख ते 5 लाखापर्यंत असू शकतो.

हे ही वाचा: नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकीची सूचना जाहीर

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट

दहावीनंतर (career) तुम्ही डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करू शकता आणि हा कोर्स तुम्ही अनेक खाजगी व सरकारी संस्थांच्या माध्यमातून करू शकता. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला पन्नास हजार ते दोन लाखापर्यंतचे खर्च होऊ शकते. हा एका वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला वार्षिक पगार 2 लाख ते 4 लाख पर्यंत मिळू शकतो.

डिप्लोमा इन फार्मसी

दहावी नंतर तुम्हाला हा दोन वर्षाचा कोर्स करता येऊ शकतो आणि यामुळे तुम्हाला खाजगी फार्मसी चांगल्या पगारात नोकरी देतात.

हे ही वाचा: BSNL चे सर्वात स्वस्त प्लॅन ! प्रतिस्पर्धी कंपन्यांना धसका

आयटीआय (ITI)

दहावीनंतर ITI (career) डिप्लोमात समावेश आहे. या डिप्लोमा मध्ये इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मेकॅनिक, स्टेनो, कंप्यूटर यांसारख्या विषयांचा समावेश होतो.जर तुम्ही दहावीनंतर हा डिप्लोमा केला तर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता ही खूप जास्त आहे.

स्टेनोग्राफी आणि टायपिंग

दहावीनंतर हा कोर्स केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. न्यायालय आणि सरकारी क्षेत्रात स्टेनो पदांसाठी अनेक जागा मोकळ्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि हा कोर्स केल्याने तुम्हाला खाजगी व सरकारी नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात.

हे ही वाचा: आरोग्यदायी करवंद आणि त्याचे फायदे मोजक्या शब्दात !

कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग

आजचे युग संगणकाचे आहे म्हणून प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर दिसून येतो. या कोर्स नंतर तुम्हाला संगणक व नेटवर्किंग विषयी अधिक माहिती मिळते आणि या क्षेत्रात नोकरी मिळणे तुम्हाला अजूनच सोपे होऊन जाते.

डिप्लोमा इन agriculture सायन्स

ज्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राची आवड आहे, ते हा कोर्स दहावीनंतर करू शकता आणि या कोर्समध्ये तुम्हाला अनेक विषयाचा अभ्यास करता येईल.

Leave a Comment