पुदिना : आरोग्यासाठी एक वरदान,सेवनाचे फायदे याबाबत सविस्तर माहिती या लेखात !
Table of Contents
पुदिना ही आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची वनस्पती आहे. पुदिनाचा कधी वापर चहा मध्ये केला जातो तर कधी वेगवेगळ्या ड्रिंक्स मध्ये पुदिनाचा वापर हा आवर्जून केला जातो. पदार्थांची चव वाढवण्यामध्ये पुदिनाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. परंतु पुदिनामुळे आपल्याला आरोग्यासाठी काय फायदा होतो याबाबत अजूनही लोकांमध्ये ज्ञान नाही. पुदिनाचा आपल्या शरीराला काय फायदा होतो आज या लेखामध्ये आता आपण पाहणार आहोत.Mint: a boon for health, detailed information about the benefits of consumption in this article !
हे ही वाचा : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीची सूचना जाहीर
इंस्टाग्राम वर आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. दीक्षा भावसार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये पुदिन्याचे मानवी शरीराला कोणकोणते फायदे होतात, कोणत्या समस्या मानवाच्या दूर होतात याची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हा जर व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहिला तर आपण नक्कीच पुदिन्याचा आपल्या नेहमीच्या वापरामध्ये उपयोग कराल हे नक्की.
आता आपण पाहणार आहोत पुदिन्याचे विविध उपयोग.
वजन कमी करण्यासाठी
जर तुम्ही वाढत्या वजनाने त्रस्त झाले असाल तर तुम्ही पुदिनाचे सेवन दररोज केले पाहिजे, त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. जर तुम्हाला मनस्थिती मध्ये बदल करायचा असेल अर्थात आपल्या मूडमध्ये बदल करायचा असेल तर म्हणजेच तुम्हाला फ्रेश व्हायचे असेल, चिडचिडेपणा कमी करायचा असेल, डोकेदुखी कमी करायची असेल, सर्दी, कफ सारख्या समस्या दूर करायच्या असतील, तर तुम्हाला पुदिनाच्या चहाचे सेवन करावे लागेल.
तोंडाचे आरोग्य नीट ठेवणे
पुदिन्याचा उपयोग तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा होतो. त्यामध्ये दात खराब होणे किंवा दात पिवळे होणे, तोंडाचा वास येणे, हिरड्या दुखणे, दात दुखणे इत्यादी समस्या पासून सुटका मिळवण्यासाठी पुदिन्याची पाने ही फार महत्त्वाची असतात. याचा नियमितपणे वापर आपण केला तर तोंडाचे आरोग्य नीट राहू शकते.
पचन चांगले होण्यासाठी
पुदिन्याचे सेवन केले तर आपल्या खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होते. पचन होण्यासाठी जो आवश्यक रस असतो, तो अधिक प्रमाणात तयार होतो,त्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होते.
घशाची खवखव दूर करण्यासाठी
बऱ्याच वेळा मानवी घशामध्ये खवखव होत असते. त्याची कारणे विविध जरी असली तरी पुदिना हे त्यावरील उपाय आहे असे म्हटले जाते. घशामध्ये खवखव ही कधी हवामान बदलामुळे होते तर,कधी आपल्या खाण्यातील पदार्थामुळे होते. यावर उपाय म्हणून पुदिन्याचा वापर केला जातो.
सर्दी,खोकला यावर उपाय
सर्दी,खोकला या नियमित येणाऱ्या समस्या आहेत. सर्दी,खोकला दूर करण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. खोकला किंवा सर्दी झाला तर पुदिना घातलेला चहा जर पिला तर आपली सुटका यापासून होऊ शकते.
पुदिन्याचा वापर कसा कराल
पाच ते सात पाने पातेल्यात एक ग्लास पाणी टाकून उकळत ठेवावीत. पाणी पाच मिनिटापेक्षा जास्त उकळू नये. त्यानंतर गरजेनुसार साखर टाकावी. दररोज या मिश्रणाचे सेवन करावे नक्कीच फरक जाणवेल.
तर आज आपण पाहिले की पुदिना या आरोग्यदायी वनस्पतीचे महत्व.