नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकीची सूचना जाहीर

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकीची सूचना जाहीर या विषयी सविस्तर माहिती

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक 2024 निवडणुकीची सूचना (नमुना-1) प्रसिध्द करणेबाबत मा. भारत निवडणूक आयोगाचे संदर्भीय प्रेस नोट द्वारे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशाप्रमाणे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची सूचना (नमुना-1) मराठी व इंग्रजी प्रती सोबत जोडून पाठविण्यात येत आहेत. उपरोक्त निवडणुकीची सुचना दि. 31 मे 2024 रोजी खालील ठिकाणी प्रसिध्द करण्यात यावी व प्रसिध्दी अहवाल त्याच दिवशी या कार्यालयास सादर करावा असे वरिष्ठ पातळीवरून सूचना आहेत.

हे ही वाचा: BSNL चे सर्वात स्वस्त प्लॅन ! प्रतिस्पर्धी कंपन्यांना धसका

यांना सूचना प्राप्त झाल्या आहेत.

1) जिल्हाधिकारी कार्यालय
3) महानगरपालिका/नगरपालिका कार्यालय (सर्व) 5) तहसिलदार यांचे कार्यालय (सर्व)
7) ग्रामपंचायत कार्यालय (सर्व)
2) जिल्हा परिषद कार्यालय
4) उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय (सर्व)
6) पंचायत समिती कार्यालय (सर्व)
8) मतदार संघातील संबंधित सर्व गाव चावडीवरील सूचना फलकावर

हे ही वाचा: आरोग्यदायी करवंद आणि त्याचे फायदे मोजक्या शब्दात !

याव्दारे सूचना देण्यात येत आहेत कि,

१) नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे.

२) नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, नाशिक विभाग किंवा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडे विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड, नाशिक येथे त्यांच्या दालनात, दिनांक ०७ जून २०२४ (शुक्रवार) पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यत सुपूर्द करता येतील.

३) नामनिर्देशन पत्राचे नमुने उपरोक्त ठिकाणी व उपरोक्त वेळेत मिळू शकतील.

४) नामनिर्देशन पत्रांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांचे कार्यालय, नाशिक रोड, नाशिक येथे दिनांक १० जून, २०२४ (सोमवार) रोजी सकाळी ११.०० वाजता सुरु करण्यात येईल.

हे ही वाचा: नवीन शैक्षणिक वर्षापासून बालवाडी,अंगणवाड्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होण्याची शक्यता.

५) उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकृत केलेल्या त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला वरील परिच्छेद (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दिनांक १२ जून, २०२४ (बुधवार) दुपारी ०३.०० वाजेपर्यत देता येईल.

६) निवडणूक लढविली गेल्यास दिनांक २६ जून, २०२४ (बुधवार) रोजी सकाळी ०८.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यत मतदान घेण्यात येईल.

ठिकाण :- नाशिक
दिनांक : ३१ मे २०२४.


Leave a Comment