नवीन शैक्षणिक वर्षापासून बालवाडी,अंगणवाड्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होण्याची शक्यता.

नवीन शैक्षणिक वर्षापासून बालवाडी,अंगणवाड्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होण्याची शक्यता याबाबत सविस्तर माहिती.

जसे जसे नवीन शैक्षणिक वर्ष जवळ येत आहे तशी तशी सरकारचे नवीन धोरण काय आहे याची स्पष्टता होत असताना दिसून येत आहे. (एनईपी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता निर्माण झाली असून पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना नेमके काय शिकवायला हवे, त्यांच्यात कोणत्या क्षमता चा विकास व्हायला हवा, याचा अभ्यासक्रम तयार होत आहे असे बोलले जात आहे.

हे ही वाचा : राज्य अभ्यासक्रम आराखडा : 2024 मसुद्यावर पालकांनी आणि शिक्षकांनी प्रतिक्रिया नोंदविणे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबाबत घोषणा होऊन बराच कालावधी झाला असून त्याबाबत अजून ठोसपणे कोणतीही कार्यवाही होत नसताना दिसून येत होती. परंतु 2024 या वर्षी पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकायला हवे याचा अभ्यासक्रम नुकताच तयार झालेला आहे. या पहिल्या टप्प्यानंतर पुढील अंमलबजावणी 2030 पर्यंत करण्यात येणार असून यंदाची सुरुवात पूर्व प्राथमिक स्तरापासून करण्यात येणार आहे अशी सकाळ मीडिया रिपोर्टनुसार समजते.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांचे प्रशिक्षण वर्ग लवकरच घेण्यात येणार असून त्याबाबत कार्यवाही सुरू आहे असे समजते.

हे ही वाचा : पंजाबराव डख यांचे भाकित : चक्री वादळाचा अडथळा आणि महाराष्ट्रात मान्सून सक्रियतेबाबत.

तीन ते आठ वयोगटातील मुलांची बौद्धिक क्षमता ही प्रचंड असते, त्यामुळे या वयानुसार अभ्यासक्रमाचा आराखडा सुद्धा तयार करण्यात येणार आहे. सामान्य शिक्षणाबरोबरच कला,कार्यानुभव,शारीरिक शिक्षण यावर सुद्धा विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

Leave a Comment