12 जानेवारीपर्यंत नोंदणी; ‘परीक्षा पे चर्चा’ पालकांना सहभागी होता येणार|

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी,शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत सातवा संवादात्मक कार्यक्रम हा तालकटोरा स्टेडियम,नवी दिल्ली येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.या संवादात्मक कार्यक्रमात सहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी,शिक्षक,पालक देखील यात सहभागी होऊ शकतात. याविषयी सविस्तर माहिती.

‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम मागील सात वर्षांपासून घेतला जातो. हा कार्यक्रम शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमांमध्ये सहावी ते बारावीपर्यंत शिकत असणारे विद्यार्थी शिक्षक व पालक हे सर्व या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी जानेवारीपर्यंत नोंदणी करावी असे स्पष्टपणे निर्देश प्राथमिक चे संचालक शरद गोसावी यांनी दिले आहे.

हे ही वाचा

निपाह व्हायरस ची दहशत : निपाह संपुर्ण माहिती.देशात अलर्ट

प्राथमिकचे संचालक शरद गोसावी म्हणाले की,’परीक्षा पे चर्चा’ मध्ये सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्याची निवड करण्यासाठी 12/12/2023 पासून https://innovateindia.mygov.in/ppc या लिंक वर ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा आयोजित केली जात आहे.12/12/2023 ते 12/1/2024 या कालावधीमध्ये सहावी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी शिक्षकांनी पालकांसाठी सहभाग घेण्याकरिता ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सहभागी विद्यार्थी पालक,शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना संचालक यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

हे ही वाचा

संचालक बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात नोकरी ! 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करा.

या परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहावी ते बारावीच्या व सर्व माध्यमांच्या सर्व बोर्डाच्या शाळांना सहभाग घेण्यास आव्हान करण्यात आले आहे.तालुका व जिल्हा स्तरावरील समग्र शिक्षा अभियान,प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना संबंधित क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पट असलेल्या शाळांना ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाकरिता नोंदणी करण्यासाठी शाळा नेमून देण्यात याव्यात.’परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालक यांच्या देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा यासाठी संबंधित शाळांनी पालकांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून आव्हान करावे याचा फायदा म्हणजे अधिक पालक सहभागी होऊ शकतील.असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment