सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हा. या तारखेला स्पर्धा

सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हा. 21 जानेवारीला स्पर्धा होणार असून याविषयी सविस्तर माहिती.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अनेक सामाजिक संस्था कडून विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असतात.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यव्यापी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ या वर्षी २१ जानेवारीला होणार आहे. ही चित्रकला स्पर्धा गोव्यात व महाराष्ट्र या राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी होणारी सर्वांत मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची प्रसिद्धी आहे.

हे ही वाचा: PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती सुरू|

सकाळ चित्रकला स्पर्धा ही काही वर्षांपासून दरवर्षी होत असते. यंदा या स्पर्धेला 39 वर्ष पूर्ण झाले असून कोरोनाच्या काळात देखील या स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आल्या होत्या. 1985 पासून 38 वर्ष सातत्याने ही स्पर्धा होत आहे.

आत्तापर्यंत या स्पर्धेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून,२०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.

मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरुवात झाली. दरवर्षी लाखो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत व त्यांचा सहभाग दरवर्षी वाढत जाणारा आहे.

स्पर्धेची रूपरेखा

ही ‘सकाळ चित्रकला’ स्पर्धा प्राथमिक,उच्च माध्यमिक व माध्यमिक, महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी या सर्वांना यामध्ये सहभागी होता येईल.

स्पर्धेसाठी प्रतिस्पर्धक ५० रुपये शुल्क आहे. स्पर्धा एकूण सहा गटांत होणार असून, शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा (इयत्ता पहिली ते दहावी) त्यांनी निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष (ऑफलाइन) होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असेल.

लिंक : chitrakala.sakalnie.in

www.ticketkhidakee.com

हे ही वाचा: नाशिक मधील ध्रुवनगर मनपा शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न

नियम

● कोणत्याही गटासाठी रंग साहित्याच्या विशिष्ट माध्यमांचे बंधन नाही.

● चित्र कोणत्याही रंग साहित्याने रंगवू शकता.

● स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे दिला जाईल.

● स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही.

● स्पर्धेचे नियम, ऑफलाइन स्पर्धा केंद्रांचे तपशील, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व जेष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या ऑनलाइन स्पर्धेबाबतची माहिती ‘सकाळ’मधून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.

शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे गट व वेळ (प्रत्यक्ष स्पर्धा)

● ‘अ’गट-पहिली व दुसरी

● ‘ब’गट-तिसरी व चौथी

● वेळ – सकाळी ११ ते १२.३०

● ‘क’ गट-पाचवी ते सातवी

● ‘ड’गट-आठवी ते दहावी

● वेळ – सकाळी ९ ते १०

हे ही वाचा: नाशिक जिल्हास्तरीय बालमहोत्सव : 2024 खुली रंग भरण स्पर्धा सहभागी व्हा

ऑनलाइन स्पर्धा

‘फ’गट-पालक व जेष्ठ नागरिक

‘इ’गट- सर्व प्रकारच्या विद्याशाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी

वेळ

स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत चित्र अपलोड करता येईल.

संपर्क

● राज्यभरातील प्रमुख शहरांतील आश्रम शाळांमधील विद्यार्थी, आदिवासी एकात्मिक प्रकल्प संचालित आश्रम शाळा, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग शाळांमधील विद्यार्थीसुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

● प्रमुख शहरातील आश्रम शाळा व विशेष आणि दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेसाठी 9881598815 या क्रमांकावर व rahul.garad@esakal.com या ईमेलवर संपर्क साधावा.

Leave a Comment