स्काऊट व गाईड विषयांना अनुरूप गणवेश दुस-या टप्प्यात मिळणार याची संपूर्ण माहिती
Table of Contents
नाशिक महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्ता पर्यंत पहिल्या टप्प्यातील गणवेश प्रती विद्यार्थी प्राप्त झाला आहे.लवकरच दुस-या टप्प्याची कार्यवाही प्रशासनाकडून होत असताना दिसत आहे.
याबाबत मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक मा.प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांच्या स्वाक्षरीने आज सोमवार रोजी सर्व नागरी साधन केंद्रांना व शाळांना प्राप्त झाले.Children of Nashik Municipal Corporation schools will soon get second stage uniforms for Scout and Guide disciplines: Check out the guidelines received from the Education Department.
हे ही वाचा
मोकळ्या जागेपासून पैसे कसे मिळवू शकाल |यातील एक तरी पर्याय लागू पडेल
दुसऱ्या टप्यात १९७५९ विदयार्थ्यांसाठी स्काऊट व गाईड विषयास अनुरूप एक शालेय गणवेश शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून उपलब्ध करून देणेसाठी प्रत्येकी रू.३००/- प्रमाणे एकूण रू. ५९.२८. लक्ष तरतूद PFMS प्रणालीचे माध्यमातून Child Limit स्तरावर उपलब्ध झालेले आहे. त्यानुसार सर्व लाभार्थी शाळांनी यापुर्वी समग्र शिक्षा शालेय गणवेश अनुदान मागणी नोंदविलेनुसार उपलब्ध अनुदानाच्या अधिन राहून नागरी साधन केंद्र निहाय प्रत्येकी लाभार्थी शाळांना प्रति विदयार्थी एक स्काऊट व गाईड गणवेशाचे प्रत्येकी रु. ३००/- प्रमाणे शाळानिहाय अनुदान नागरी साधन केंद्र (URC) स्तरावर खालीलप्रमाणे उपलब्ध करणेसाठी नस्ती मा.आयुक्त मनपा नाशिक यांचे मान्यतेस्तव सादर करणेत आलेली आहे.
समग्र शिक्षा सन 2023-24 अंतर्गत संदर्भित लाभार्थी विदयार्थ्यांना दुसन्या टप्यात स्काउट व गाईड विषयास अनुरूप शालेय गणवेश शाळा व्यवस्थापन समिती उपलब्ध करून देणे कामी सबंधित नागरी साधन केंद्र व शाळा व्यवस्थापन समित्यांनी पुढील अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे. अटी व शर्ती :-
१) सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षासाठी समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व विदयार्थ्यांना २ गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन शाळा व्यवस्थापन समिती मार्फत देण्यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे निधी राज्य प्रकल्प संचालक मप्राशिष मुंबई यांनी उपलब्ध केलेला आहे.Children of Nashik Municipal Corporation schools will soon get second stage uniforms for Scout and Guide disciplines: Check out the guidelines received from the Education Department.
हे ही वाचा
एकदा चार्ज केल्यावर चालते 70 किलोमीटर ही इलेक्ट्रिक सायकल|बाजारात नवीन येणार येत्या दिवाळी नंतर .
२) मोफत गणवेश योजनेंतर्गत अनेक शाळांनी व कापड उदयोजकांनी विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय सन २०२३-२४ या वर्षांसाठीचे गणवेश तयार करण्याचे काम केले आहे. सदर तयार गणवेशामुळे सबंधितांचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून शासनाने शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केल्यानुसार विदयार्थ्यांना पहिल्या टप्यात वितरीत अनुदानास अधिन राहन नियमीत शालेय गणवेश उपलब्ध करून दयावा. याबाबत या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मनपाना / सशि/गणवेश योजना २०२३-२४/११ दि. १२.०६.२०२३ अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
३) विदयार्थ्यांना उर्वरित एक गणवेश स्काउट व गाईड विषयास अनुरूप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळया रंगाची हाफ पेंट तसेच मुलींना आकाशी रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळया रंगाची व कमीज आकाशी रंगाची शाळा व्यवस्थापन समिती मार्फत देयात यावा. प्रस्तुत गणवेशाबाबतची सर्व साधारण रचना सोबत परिशिष्ट अ मध्ये जोडली आहे. तसेच विषयाच्यांच्या शर्ट वरती शोल्डर स्ट्रिप (Shoulder Strip) दोन खिसे (Double Pocket) असणे आवश्यक आहे.
४) स्काउट व गाईड विषयासाठी आवश्यक असणा-या गणवेशामधील टोपी व स्कार्फ याबाबत वेगळयाने आदेश निर्गमित करण्यात येतील.
हे ही वाचा
शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी असते : अटी,शर्ती व निकष असे आहेत.
५) स्काउट व गाईड या विषयाच्या तासिका आठवडयातून दोन दिवस असतात, त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते. त्यामुळे मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी स्काउट व गाइड विषयास अनुसरून उपलब्ध करून देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील.
६) तसेच उर्वरित सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्यात यावा.
(७) पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच सन २०२४-२५ पासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये मोफत गणवेश योजनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करू नये, याबाबतच्या त्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे गणवेश लाभ दिला जात असल्यास दुवार लाभ देण्यात येवू नये.
८) तसेच नाशिक महानगरपालिकेकडून त्यांच्या स्वनिधीतून महानगरपालिका शाळांतील इतर संवर्गातील विद्याथ्यांना गणवेश उपलब्ध करून देत असल्यास अशा विद्यार्थ्यांना दुबार समग्र शिक्षा अंतर्गत गणवेशाचा लाभ देण्यात येवू
९) यापूर्वी शाळानिहाय गणवेश वितरण अनुदान Limit यादीत नमूद रकमेच्या अधिन राहून सदरची खरेदी प्रक्रिया राबवावी.नये.
हे ही वाचा
नाशिक महानगरपालिका शाळांची वेळ बदलली.पहा कोणत्याही शाळेची वेळ तासिका नियोजनासह.
१०) या कार्यालयास उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत राहून सदयस्थितीत फक्त मनपाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील इ. 1 ते 8 च्या लाभार्थी विदयाथ्यांकरिता अनुदान वितरीत करणे प्रस्तावित आहे. माशिप कडून वाढीव अनुदान उपलब्ध झाल्यानंतर मनपा माध्यमिक शाळांतील इ. 8 वी च्या लाभार्थी विदयार्थ्यांना गणवेश अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.
१२) सदर योजना अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडील काही ठळक मार्गदर्शक सुचना नुसार लाभार्थी विदयाथ्यांना अल्पसंख्याक विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग अथवा शासनमान्य वसतिगृहे या विदयार्थ्यांना इ. 1 ली सह इतर वर्गातील नव्याने प्रवेशित निकष पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेशाचे वाटप होईल याची दक्षता घ्यावी.
१२) शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणेच स्काउट व गाईड विषयास अनुरूप शालेय गणवेशाचा रंग स्पेसिफिकेशन, प्रकार यासह सर्व विहीत प्रक्रिया राबवून गणवेश खरेदी पुरवठादार निश्चित करणे, गणवेश पुरवठा आदेश देणे, संपूर्ण खरेदी प्रक्रिया करणे यासह सर्व निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घ्यावेत.
१३) याबाबत राज्य, जिल्हा/मनपा, तालुका स्तरावर निर्णय घेण्यात येवू नये. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शाळांनी याबाबत
प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण विभाग नाशिक, समन्वयक नासाके 1 व 2 व केंद्रसमन्वयक समूहसाधन केंद्र (सर्व) यांना
विचारणा वा पत्रव्यवहार करण्यात येवू नये. १४) प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीने त्यांच्या शाळेतील गणवेश पात्र विदयार्थ्यांना वयोगटानुसार व विदयार्थ्यांच्या मापानुसारच स्काउट व
गाईड विषयास अनुरूप शालेय गणवेश खेरदी करून वितरीत करावयाचे आहेत. १५) तसेच गणवेशाचे कापड दर्जेदार असणे व गणवेशाची शिलाई पक्क्या धाग्याची असावी याबाबतची सर्व जबाबदारी सबंधित शाळा व्यवस्थापन समितीची राहील.
हे ही वाचा
Jio BP petrol pump Dealership मिळवा आणि महिन्याला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये कमवा. सुवर्णसंधी
१६) सदर योजना अलबजावणी करणे संदर्भाने मप्राशिप मुंबई कार्यालयाचे निर्देशास अधीन राहून प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण विभाग, नाशिक यांनी सर्व लाभार्थी शाळांना कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येईल.
१७) शाळा व्यवस्थापन समित्यांनी विहीत प्रक्रियेचा अवलंब करून दुसन्या टप्प्यातील गणवेश खरेदी करावी व याबाबतच्या देयकांची PFMS प्रणालीद्वारेच होईल याची नोंद घ्यावी. यासदंर्भाने सर्व अभिलेखे, संपूर्ण हिशोबाच्या अचूक नोंदी व इतर दस्तऐवज दुय्यम स्वरुपात (झेरॉक्स) जतन करून ठेवण्यात यावे.
१८) शाळा व्यवस्थापन समित्यांनी मप्राशिष व शासनस्तरीय लेखापरिक्षणासाठी आवश्यक सर्व दिनांक निहाय अभिलेखे जसे नमूना गणवेश, कोटेशन्स, पुरवठा आदेश, डिलेवरी चलन, व्हावचर, PEMS प्रणाली द्वारे निर्मित PPA. गणवेश कापडाचे स्पेसिफिकेशन नुसार लॅब टेस्टिंग रिपोर्ट व हिशेब वेळोवेळी सादर करणे आवश्यक राहील यादृष्टीने योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
१९) शाळा व्यवस्थापन समित्यांनी गणवेश वाटपाबाबतचे विहीत नमुन्यातील स्टॉक रजिस्टर ठेवण्यात यावे. यात गणवश प्राप्त व वितरण दिनांकसह विदयार्थ्याच्या पालकांची स्वाक्षरी वा विदयार्थ्याच्या अंगठयाचे ठसे घेण्यात यावे,
हे ही वाचा
ठाणे महानगरपालिका नोकरभरती : वरिष्ठ निवासी पदांसाठी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहा.
२०) शाळा व्यवस्थापन समित्यांनी मंजूर तरतूदीपेक्षा जादा खर्च करण्यात येवू नये. तसेच सन २०२३-२४ करिता प्राप्त नागरी साधन केंद्र स्तरावर शाळानिहाय Limit अनुदानाचे अधिन राहून गणवेश खरेदी प्रक्रिया राबवानी व खर्च करणेत यावा. याबाबतचे विहीत नमुन्यातील विनियोग प्रमाणपत्रासह शाळानिहाय संपुर्ण नस्ती दि. ३१/०८/२०२३ अखेर तालुका / URC कार्यालयास जमा करणे आवश्यक राहील.
२१) मप्राशिष मुंबई व मा. शिक्षण संचालक (प्राथ) शिक्षण संचालनालय, पुणे यांना मनपा स्तरीय उपयोगिता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर करता येईल यापद्धतीने नागरी साधन केंद्र कार्यालयांनी शाळांकडून संकलित अहवालाचे आधारे एकत्रित उपयोगिता प्रमाणपत्र मनपा कार्यालयास दि. ३१/०८/२०२३ अखेर तातडीने सादर करणे आवश्यक राहील.
२२) कोणत्याही परिस्थितीत स्काउट व गाईड विषयास अनुरूप शालेय गणवेशापासून समग्र शिक्षा गणवेश योजनेशी संदर्भित एकही लाभार्थी विदयार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.