इलेक्ट्रिक सायकल एकदा चार्ज केल्यावर चालते 70 किलोमीटर|बाजारात नवीन येणार येत्या दिवाळी नंतर.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने कार किंवा दुचाकी वापरणे खूप महाग झाले आहे.या कारणामुळे जर आपल्याला पैसे वाचवायचे असतील तसेच आपले आरोग्य ही तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आपल्यासाठी इलेक्ट्रिक सायकल हा एक चांगला पर्याय आहे. तंत्रज्ञानामध्ये सुद्धा बरेच बदल होत आहेत.युरोपमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक देशांनी खूप प्रगती केलेली दिसून येते.

70 km electric bicycle on a single charge | New in the market after Diwali

हे ही वाचा

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी बाबासो जानकर यांची निवड

चीनमध्ये लोक इलेक्ट्रिक सायकलचा जास्त वापर करतात.कार व दुचाकी यांच्यापेक्षा त्या देशातील एकट्या सायकलचा खूप जास्त वापर केला जातो.तसेच चीनमध्ये रस्ते खूप चांगले आहेत.त्यामुळे इलेक्ट्रिक सायकल चालवणे सहज शक्य होते.चीनमधली इलेक्ट्रिक सायकल आपल्या देशात चालत नाहीत, कारण आपल्याकडचे रस्ते इतके चांगले नाहीत. त्यामुळे काही कंपन्यांनी त्यामध्ये सुधारणा केली आहे आणि भारतात अशा इलेक्ट्रिक सायकली Launch करत असल्याचे अलीकडे दिसून येत आहेत.अलीकडेच एका कंपनीच्या प्रतिनिधींनी कृषी प्रदर्शनात काही सायकली ठेवल्या होत्या.

अतिशय सुंदर सायकली असल्याचे जाणवले.आणि समाज माध्यमातून त्याचे व्हिडीओ ही शेयर होत असताना दिसत आहेत.या सायकली एकदा चार्ज केल्यानंतर 70 किलोमीटर जाऊ शकतात असे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.या इलेक्ट्रिक सायकलला विकसित करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर ही सायकलअस्तित्वात आल्याचे समजते.या सायकलचे खास वैशिष्टे खालील प्रमाणे आहेत.

70 km electric bicycle on a single charge | New in the market after Diwali

हे ही वाचा

सातपुर कॉलनीतील जिजामाता मनपा शाळा क्र.28 मध्ये मा.प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांच्या उपस्थितीत भव्य माता पालक मेळावा.

या इलेक्ट्रिक सायकलची वैशिष्ट्ये;

1) इलेक्ट्रिक सायकलचा वापर शहरातील लोकांना जास्तीत जास्त होऊ शकेल असे दिसते. ग्रामीण भागामध्ये सुद्धा वापरली जाऊ शकते. ग्रामीण भागातील लोकांना परवडेल अशी किंमत या सायकलची असणार आहे.

2) ह्या सायकलची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी जवळजवळ 4 तासांचा कालावधी लागतो. बॅटरी चार्ज झाल्यानंतर 60 ते 70 किलोमीटर इतकी जाऊ शकते.

3) सायकलचे बॅटरीचे चार्ज लाईफ 1000 चार्जचे आहे.म्हणजेच बॅटरी 1000 वेळा चार्ज केली जाऊ शकते.दिवसातून एकदा चार्ज केली तर ती 1000 दिवस चालू शकेल.हजार दिवसानंतर मात्र बॅटरी बदलावी लागेल.

4) इलेक्ट्रिक सायकल मध्ये इंडियन मॉडेल सायकलची किंमत 27 हजार एवढी आहे.

हे ही वाचा

शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी असते : अटी,शर्ती व निकष असे आहेत.

5) परदेशात निर्यात करण्यासाठी जी सायकल तयार केली आहे त्या इलक्ट्रिक सायकलची किंमत 35 हजार एवढी आहे.कारण या सायकल ची body अल्युमिनियम असणार आहे.

6) इलेक्ट्रिक सायकल मध्ये ट्रेकिंग सिस्टीम सुद्धा आहे. जर सायकलची चोरी झाली तर ती सायकल कशी आहे कुठे आहे कळते.

7) जर या सायकल मध्ये काही समस्या आली असेल तर त्या सायकलला मेकॅनिकल इंजिनिअर कडे घेऊन जावे लागते.याचे इलेक्ट्रिक इंजिनियर सुद्धा असणार आहेत.

इलेक्ट्रिक सायकलचा फायदा;

  1. इलेक्ट्रिक सायकलमुळे पेट्रोल आणि इंधन यांची बचत होते.
  1. या सायकलची किंमत कमी असल्यामुळे गोर गरीब लोकांनाही सायकल घेता येणे शक्य होणार आहे.
  1. इलेक्ट्रिक वाहन वापरल्यामुळे प्रदूषणावर मात करू शकतो व पर्यावरणाची हानी होणार नाही.
  1. विषारी उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
  1. कार्बन आणि नायट्रोसॉक्साईड सारखे वायू हवेत मिसळणार नाहीत.

6. या सायकलीसाठी कोणताच खर्च करण्याची गरज नाही.कारण या सायकलीला maintenance ची इतकी आवश्यकता नाही.battery काढून आपण ती घरी चार्ज करू शकतो आणि परत ती सायकलला लावू शकतो.

हे ही वाचा

नाशिक महानगरपालिका शाळांची वेळ बदलली.पहा कोणत्याही शाळेची वेळ तासिका नियोजनासह

ही सायकल कृषी प्रदर्शनात मांडण्यात आली होती त्यावेळी ही माहिती मिळाली आहे.प्रत्यक्ष कंपनीच्या प्रतिनिधीला संपर्क साधला होता.ही इलेक्ट्रिक सायकल दिवाळीच्या नंतर बाजारात मिळण्याची शक्यता आहे असे समजले.

इलेक्ट्रिक सायकल विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क: दिलीप चौधरी

नंबर: 9326175799

Leave a Comment