नाशिक महानगरपालिका परिवहन महामंडळ लिमिटेड सिटी लिंक च्या महाव्यवस्थापक पदाची भरती
नाशिक महानगरपालिका परिवहन महामंडळाकडून चालवण्यात येणारी बस सेवेला आता चालू होऊन बराच कालावधी लोटला असून नाशिक महानगरपालिका शहर बस सेवेकरिता कार्यरत नाशिक महानगरपालिका परिवहन महामंडळ लिमिटेड सिटी लिंक करिता महाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिक) या पदाचे खालील शैक्षणिक पात्रता व अनुभव धारण असलेल्या उमेदवाराची दरमहा एक वट मानधनावर मुलाखती द्वारे कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात सहा महिने कालावधीपर्यंत नेमणूक करावयाची आहे.
हेही वाचा : “आठवणीतील कात्रण संग्रह” : नाशिक मनपा उपशिक्षक राहुल कोळी यांचा अनोखा उपक्रम
हेही वाचा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त धृवनगर मनपा शाळेत “पुस्तक वाचन” उपक्रम.
यासाठी या पदासाठी इच्छुक उमेदवार आणि अर्ज सादर करावेत असे nmc.gov.in त्या वेबसाईटवर दिलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या परिपत्रकात म्हटले आहे. ही मुलाखत 15 डिसेंबर 2023 रोजी दुपारी एक वाजता नाशिक महानगरपालिका परिवहन महामंडळ लिमिटेड सिटी लिंक भवन, वीर सावरकर तरण तलाव समोर त्रंबक रोड नाशिक येथे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार यांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचय पत्र सर्व आवश्यक कागदपत्रासह या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.