ठाणे महानगरपालिका नोकरभरती : वरिष्ठ निवासी पदांसाठी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहा.

महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकऱ्यांच्या सुवर्ण संधी अलीकडे मिळत आहेत.विविध नोकर भरतीच्या जागा विविध स्तरावरून निघत आहेत.बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी माहित व्हावी या उद्देशाने आम्ही देत आहोत नोकरीची संपुर्ण माहिती.. ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयात जवळ जवळ अकरा पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.जरी अकरा महिने कालावधी साठी असली तरी ती मुदत वाढवून मिळू शकते किंवा कायम सुद्धा नोकरी होऊ शकते. मार्गदर्शक सूचना काय आहेत,जाहिरात काय आहे, संपुर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.पदे कोणती आहेत व उमेदवाराची पात्रता कोणती आहे, याबाबत सर्व माहिती खाली दिलेली आहे. Authority Municipal Commissioner Novarty : Apply for the post of Senior Officer.

हे ही वाचा

५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळते दोन लाखांचे व्याज : Post office ची धमाकेदार योजना | 5 Lakhs investment wise: 2 Lakhs Interest Post Office’s Explosive Scheme

महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ निवासी या पदाकरीता अकरा (११) महिने कालावधीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारानी कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे येथे शुक्रवार दि.०१.०९.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे. Authority Municipal Commissioner Novarty : Apply for the post of Senior Officer.

हे ही वाचा

आजच अर्ज करा ! महाराष्ट्र शासन : १० वी व १२ वी,पदवीधर युवकांच्या भरतीस प्रारंभ


उमेदवारांनी सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्र इ. मुलाखतीच्या वेळी दोन प्रती मध्ये स्वयंसाक्षाकित/ प्रमाणित करुन सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करित नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाकरिता तात्पुरत्या स्वरुपात अकरा (११) महिने कालावधीकरीता वरिष्ठ निवासी पदे भरावयाची असल्याने सदर पदाची पदसंख्या व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे.

या ठिकाणी जाहिरात देण्यात आली आहे.Download करून घ्यावी

हे ही वाचा

शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका,अधिकार व कार्ये जाणून घ्या

मार्गदर्शक सूचना :

हे ही वाचा

B.ed Admission प्रक्रिया सुरु झाली आहे. ycmou मार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचे रजिस्ट्रेशन सुरु,त्याबाबत खाली माहिती पहा.

१. कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष असावे.

२. अर्जा सोबत सर्व आवश्यक कागदपत्र / प्रमाणपत्र व महाराष्ट्र मेडीकल कॉन्सील (MMC) कडील वैध नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

३. अपूर्ण असलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

४. निवड झालेल्या वरिष्ठ निवासी उमेदवाराची ठाणे महानगरपालिकेतर्फे निवासाची व्यवस्था करण्यात येईल.

५. थेट मुलाखतीकरीता उपस्थित राहणेकरीता कोणतेही शुल्क किंवा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

६. सदरची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.thanecity.gov.in प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

Leave a Comment