शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका,अधिकार व कार्ये जाणून घ्या.

शाळा व्यवस्थापन समिती (SMC) हे शाळेमध्ये असलेल्या महत्त्वाच्या समित्या पैकी सर्वात महत्त्वाची समिती म्हणून ओळखली जाते. शाळेसंबंधीच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत SMC चा समावेश असतो. SMC ची बैठक महिन्यातून एकदा किंवा गरज पडेल तेव्हा आयोजित केली जाते.SMC चे अध्यक्ष हे पद सर्वात महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर विविध पदे या एसएमसी मध्ये असतात. अध्यक्ष,उपाध्यक्ष्, सचिव शिक्षणतज्ञ,सदस्य इत्यादी पदाधिकारी मिळवून SMC तयार होते. आज आपण शाळा व्यवस्थापन समिती अर्थात SMC विषय अत्यंत महत्त्वाची भूमिका आणि कार्य पाहणार आहोत.Know the role, powers and functions of School Management Committee.

शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका व कार्य

शाळेचे संनियंत्रण

१) शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे.

२) आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्याची शिफारस करणे

३) त्या शाळेस शासनाकडून / स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.

४) बालकांचे हक सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे…

 ५) शिक्षकांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.

६) अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे सनियंत्रण करणे.

७) बालकांची १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहिल यासाठी दक्षता घेणे.

८) शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालकांचे सनियंत्रण करणे.

९) शाळा बाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.

१०) शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्यन सुविधांचे सनियंत्रणे करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.

११) शाळेतील मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे सनियंत्रण करणे.

१२) शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्च लेख तयार करणे.

१३) शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत,भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे

१४) मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे..

(१५) निरुपयोगी साहित्य रु. १०००/- (एक हजार रुपये मात्र ) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे. 

१६) शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख करणे.

१७) शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करुन किंवा लेखी स्वरुपात सूचना देणे व त्यांचे वर्तमान सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे.

१८) शालेय व्यवस्थापन समितीच्या मासिक सभेला उपस्थित राहणे व त्याचप्रमाणे मागील महिन्याचा आढावा आणि पुढील महिन्याचे नियोजन तयार करणे.

१९) विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीची सुनिश्चिती करणे. 

२०) शालेय व्यवस्थापन समितीच्या सभेला दोन विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवणे,

वरील मुद्याच्या आधारे शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य व कर्तव्ये काय आहेत. शाळेचे प्रशासन व्यवस्थित चालण्यासाठी या समितीचे महत्वाचे स्थान आहे.Know the role, powers and functions of School Management Committee.

Leave a Comment