नाशिक महानगरपालिकेचा “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” समारंभ.
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षाकरिता “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2023 “वितरण सोहळा शनिवार दिनांक 9 /9/ 2023 रोजी दुपारी 2 वाजता महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे संपन्न होणार आहे. The “Outstanding Teacher Award” ceremony will be held on September 9 at Mahakavi Kalidas Kalamandir, Nashik.भारताचे मा.राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येत असते.त्यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वसाधारणपणे शिक्षकांना पुरस्कार दिला जातो.
हे ही वाचा : “दप्तर मुक्त शनिवार” उपक्रमांतर्गत सातपुरच्या मनपा शाळेचे विद्यार्थी रमले शेत- मळ्यामध्ये !
या कार्यक्रमासाठी नाशिक येथे मा. नामदार .श्री दादाजी भुसे,सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री नाशिक जिल्हा यांच्या शुभहस्ते तसेच मा.नामदार श्री .छगनरावजी भुजबळ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य,यांचे प्रमुख उपस्थितसह व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दरवर्षी पाच सप्टेंबर शिक्षक दिनाला नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग सेवाभावी वृत्तीने चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी, विविध शालेय उपक्रम व सामाजिक सहभागातून चांगले काम केल्याबद्दल नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार ” जाहीर करण्यात येत असतो. या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे.The “Outstanding Teacher Award” ceremony will be held on September 9 at Mahakavi Kalidas Kalamandir, Nashik
हे ही वाचा :”आमच्या पप्पांनी गणपती आणलाय”.फेमस छोटा स्टार चिमुकला कोण आहे ?
महानगरपालिकेच्या “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” घोषित झालेल्या शिक्षकांची यादी खालील प्रमाणे आहे
आजचे शिक्षक उद्याचा समाज घडवत आहेत. विद्यार्थ्यांना घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते. विद्यार्थ्यांना उद्याचे सुजान नागरिक बनवण्यासाठी शिक्षक जे काही करतात त्याची परतफेड आपण कधीच करू शकत नाही, मात्र फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांचा सन्मान आणि कौतुक नक्कीच करू शकतो.हा पुरस्कार कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे.या गुरुजनाप्रती आदर व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे.
हे ही वाचा : “गुणवंत शिक्षक पुरस्कार” साठी चंद्रकांत कोरबू यांची राष्ट्रीय पातळीवर निवड !
निष्ठेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमास मा. डॉ .श्री अशोक करंजकर ( भा.प्र .से .आयुक्त तथा प्रशासक ) मा .श्री किशोर दराडे (आ.शिक्षक मतदार संघ), मा .ना. श्री नरहरी झिरवाळ ( उपाध्यक्ष विधानसभा) आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती महानगरपालिका शिक्षण विभागाचे मा. प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे.