पंजाबराव डख यांचे भाकित : चक्री वादळाचा अडथळा आणि महाराष्ट्रात मान्सून सक्रियतेबाबत
महाराष्ट्रामध्ये सध्या उष्णतेची प्रचंड लाट आलेली असून सामान्य जनता या उष्णतेमुळे बेजार झालेली आहे. अशात पावसाची वाट पाहणे ही एक सामान्य बाब आहे. महाराष्ट्रामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कडून उष्ण वारे वाहत असून याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील भूभाग प्रचंड तापला आहे.
हे ही वाचा : गणेश लोहार यांनी केली तब्बल सात वेळा नर्मदा परिक्रमा.
या उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत असून सर्वसामान्य लोकांची लवकर मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल व्हावा अशी इच्छा आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून 31 मे रोजी केरळामध्ये दाखल होणार आहे असा अंदाज व्यक्त केला असून अशातच बंगालच्या उपसागरात रेमन या चक्रीवादळाची निर्मिती झाल्यामुळे या मान्सूनच्या प्रवासावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची चिंता देखील हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे.
या चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे असे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सून संदर्भात माहिती देताना व्यक्त केले आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. 22 मे ला मान्सूनचे अंदमान मध्ये आगमन झाले असून तेव्हापासून मान्सूनसाठी पोषक परिस्थिती आहे असे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये मान्सून ३० ते ३१ मे ला सक्रिय होईल असे मत पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे असे ते म्हणाले.
हे ही वाचा : निर्मल ग्राम निर्माण केंद्रामध्ये बिलिफ कडून लहान मुलांसाठी समर कॅम्प
महाराष्ट्रात एक दोन आणि तीन जून 2024 ला चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात मान्सून आठ जूनच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे असे सांगितले. यावेळी लवकरच महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार अशी चिन्हे दिसत असतानाच रेमंड या चक्रीवादळामुळे मान्सून काहीसा विलंब करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जर मान्सून आठ जूनला महाराष्ट्रामध्ये दाखल झाला तर याचा फायदा निश्चितच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या काळात समाधानकारक पाऊस झाला तर शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. जोपर्यंत एक वीत ओल जमिनीत होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी केलेले आहे.