प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक शिक्षक स्तरावर समृद्धी कार्यक्रम

प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक शिक्षक स्तरावर समृद्धी कार्यक्रम सन २०२४-२५ याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे

राज्यातील शाळांतील इयत्ता ३ री ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थी/शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणाच्या द्वारे (Experiential Learning) शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

हा व्हिडिओ नक्की पहा :

सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ३ री ते इयत्ता ८ वी च्या शाळांसाठी खुला आहे. तसेच समृद्धी कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या शाळांसाठी खुला आहे.

हे ही वाचा : Know Your Army with Bhonsala हा कार्यक्रम काय आहे ?

तदनुषंगाने रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन (Experiential Learning) आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त होणार आहे. शाळांनी Arts Integration, Sports Integration, Toy Based Pedagogy, व Story Telling या चार मुद्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओची लिंक व आवश्यक माहिती

तसेच माध्यमिक स्तरावर समृद्धी स्पर्धा हा राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमचाच विस्तारीत कार्यक्रम आहे की जो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने सन २०२४-२५ मध्ये प्रथमच आयोजित केला आहे. या अंतर्गत शिक्षकांना माध्यमिक स्तरावरील (इयत्ता नववी ते बारावी) अभ्यासक्रमाच्या क्षेत्रांवर सर्वोत्तम कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धती (best art integrated pedagogical practices) यावर आधारित सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृतींच्या सादरीकरणाची संधी मिळते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP – २०२०) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम

आराखडा (NCF-२०२३) या नुसार अभ्यासक्रमीय अध्ययनामध्ये कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांचे योगदान ओळखणे आणि प्रोत्साहित करणे हा आहे.

कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये –

१. वर्गातील उपक्रम, कृती यांचा थेट संबंध अध्ययनाशी असला पाहिजे.

२. अध्ययन अनुभवांमध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन असावा ज्याद्वारे एका अध्ययन अनुभवाचा सहसंबंध दुसऱ्या अध्ययन अनुभवाशी सहज जोडता येईल.

३. अध्ययन अनुभवांमध्ये चिकित्सक विचार व २१ व्या शतकातील कौशल्ये याचाही विचार असावा.

४. अभ्यासक्रमीय ध्येये साध्य करण्यासाठी अध्यापनात स्वदेशी हस्तकला, कला, खेळणी आणि स्थानिक संसाधने यांचे एकीकरण करून अध्ययन अनुभव दिले पाहिजे.

५. सुलभक विविध सर्जनशील अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी विविध वर्ग एकत्र करून व वर्गात विविध संघ तयार करून विविध अध्ययन अनुभवांची योजना करू शकतात.

६. सुलभक आनंददायी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात.

७. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये कलेचा उत्पादन म्हणून नव्हे तर अध्ययनाची एक प्रक्रिया म्हणून विचार केला जावा.

८. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये सर्वसमावेशक शिक्षणासाठी वातावरण तयार करणे अपेक्षित आहे.

९. वर्गातील विविध अध्ययन अनुभव, कृती व उपक्रमांमध्ये स्थानिक संसाधनांच्या वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे.

१०. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीनुसार विद्यार्थ्यांमध्ये एकात्मिक कला प्रकार आणि शिकवले जाणारे विषय किंवा संकल्पना या दोन्हीमध्ये अध्ययन उद्दिष्टांची संपादणूक झाली असली पाहिजे.

समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची पात्रताः

१. शासकीय, शासकीय अनुदानित किंवा केंद्रीय अथवा राज्य बोर्डाची संलग्न अशा कोणत्याही खाजगी शाळेतील इयत्ता नववी ते बारावी या इयत्ताना अध्यापन करणारे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

२. अन्य शासकीय संस्थांचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उदाहरणार्थ तिबेटियन शाळा व्यवस्थापन, NCERT, Railways schools, KGBV किंवा Cantonment Board Schools सदर समृद्धी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

३. समृद्धी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना किमान दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे.

माध्यमिक स्तरावर समृद्धी कार्यक्रमासाठी कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये शिक्षण आधारित अध्ययन- अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओची ड्राईव लिक व आवश्यक माहिती https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQS या लिंकमध्ये भरून पाठविणे आवश्यक आहे. तसेच तयार केलेल्या व्हिडीओची लिंक दिलेल्या गुगल फॉर्मवर https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8 पेस्ट करावयाचे आहे.

रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासंदर्भात करावयाची कार्यवाही :-

सदर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांनी आपले कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना निर्गमित करावेत. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत सादरीकरणाच्या व्हिडीओची गुगल ड्राईव वरील लिंक, https://forms.gle/nPiyWRFzD9sBKpWR८ या गुगल लिंकवर पेस्ट करणे आवश्यक आहे, तसेच आवश्यक माहिती सदर लिंक वर भरणे बाबतही शाळांना सूचित करावे. तसेच समृद्धी कार्यक्रमासाठी २० मिनिटांचा व्हिडीओ व पाठाचा ५०० शब्दांच्या मयदित प्रकल्प आराखडा https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8 या गुगल लिंक वर अपलोड करावा. तसेच समृद्धी कार्यक्रमाची माहिती ही या https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8 लिंक वर भरावी.

सदर प्रकल्प आराखडा NCERT, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये अपलोड करायचा आहे. रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम मुदत दि.२९ डिसेंबर २०२४ सायंकाळी ठीक ६.०० वाजे पर्यंत असेल, हे सुद्धा सूचित करण्यात यावे, तथापि सदर कार्यक्रमांत सहभाग घेणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या व्हिडीओला अक्सेस देणे आवश्यक आहे, असेही आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.

राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERTM) येथे रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत आठ विभागाकडून प्राप्त २४ उत्तम अध्ययन कृतींच्या शिक्षक व विद्यार्थी यांच्या संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल. तसेच राज्यस्तरावर SCERTM येथे समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर आठ विभागाकडून प्राप्त ०८ उत्तम अध्ययन कृर्तीच्या शिक्षक संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल.

रंगोत्सव व समृद्धी राज्यस्तरावरील कार्यक्रमचे आयोजन दि. ११ व दि. १२ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात येईल. रंगोत्सव कार्यक्रम राज्यस्तरापर्यंतच मर्यादित आहे. तथापि समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावरील सादरीकरण करणाऱ्या उत्कृष्ट एका संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नामनिर्देशित केले जाईल.

राज्यस्तरावर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमांतर्गत सादरीकरणासाठी उपस्थित राहणाऱ्या संघांना / विद्यार्थी व शिक्षक यांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल.

उपरोक्त सविस्तर माहिती आपल्या अधिनस्त सर्व शाळांना देण्यात यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील याची दक्षता घेण्यात यावी. रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाच्या सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करण्यात यावे.

Leave a Comment