नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये गोदावरी नदीच्या स्वच्छता मोहिमेसाठी निबंध स्पर्धा व गोदावरी आरती स्पर्धांचे आयोजन | स्पर्धेचे नियम,स्वरूप आणि मुदत वाचा. 

नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये गोदावरी  नदीच्या स्वच्छता मोहिमेसाठी निबंध स्पर्धा व गोदावरी आरती स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे असे परिपत्रक मनपा शिक्षण विभागाकडून नुकतेच निघाले आहे.

हे ही वाचा

नोकरीची संधी ! पनवेल महानगरपालिकेत 377 पदांकरिता जाहिरात l जाणून घ्या मुदत आणि इतर माहिती.

हे आयोजन श्रीराम तीर्थ गोदावरी सेवा समिती नाशिक यांच्या मागणीनुसार,त्यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाला दिलेल्या २१/0७/२०२३ च्या पत्रानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये नदीच्या स्वच्छता मोहिमेसाठी निबंध स्पर्धा व गोदावरी आरती स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 सन २०२३-२४ मध्ये गोदावरी स्वच्छता अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार श्री. सुधीरजी मुनगट्टीवार यांच्या सूचनेनुसार मी गोदावरी बोलतेय… इत्यादी थीम सर्व वयोगटातील मुलांना / नागरीकांना गोदावरी नदीचे सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक राजकीय, पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व जाणून घेण्यास मदत करण्यासाठी आणि गोदावरी संवर्धनात सहभागी होण्यासाठी गोदावरी निबंध स्पर्धा व गोदावरी आरती रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. Organization of Essay Competition and Godavari Aarti Competition in schools of Nashik Municipal Corporation area for public awareness of Godavari river cleaning campaign.

हे ही वाचा

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित  समूहगीत स्पर्धा   २०२३-२४  (वर्ष २ रे) : इच्छुक शाळांनी आत्ताच गुगल फॉर्म भरा लिंक दिली आहे.

त्या अनुषंगाने प्रमुख दोन गट करण्यात आलेले असून, सह्याद्री गट( सोळा वर्षाखालील वयासाठी) व हिमालय गट ( सोळा वर्षापेक्षा जास्त वयासाठी) याप्रमाणे आहेत.

स्पर्धेचे निकष पुढीलप्रमाणेः

आरती रचना स्पर्धा करिता किमान पाच श्लोक / कडवे दोन्ही गटांसाठी लागू आहे.

निबंध स्पर्धेकरिता सह्याद्री ग्रुप करिता 300 शब्द मर्यादा आहे,

( विषय :- 1) मी गोदावरी बोलते… 2) मला अपेक्षित माझी गोदावरी….)

निबंध स्पर्धेतील हिमालय ग्रुप करिता शब्द मर्यादा 600 शब्द आहे. विषय :- 1) गोदावरी स्वच्छता अभियान

2) गोदावरी नदीचे योगदान आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व 3) गोदावरी नदी इतिहास आणि स्थित्यंतरे) 

• प्रत्येक स्पर्धेसाठी 50/- ऑनलाइन पेमेंट (भाषा मराठी,हिंदी,संस्कृत आणि इंग्रजी)

नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने गुगल लिंक व क्यूआर कोड वापरून करण्यात यावी.

नोंदणीची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 असून, जमा करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 असेल.

प्रत्येक गट आणि स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. 11000/-, द्वितीय पारितोषिक रु.5000/- व तृतीय पारितोषिक रु.3000/- तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके अशा प्रकारचे बक्षीसे दिले जातील.

सदर स्पर्धेत ज्या शाळा, महाविद्यालय, संस्था जास्तीत जास्त सहभाग घेतील त्यांना विशेष पारितोषिके देण्यात येतील,

सदर स्पर्धा ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून ऑफलाईन सबमिशन  श्री मदन गोपाल मंदिर इस्कॉन नाशिक, पोर्णिमा स्टॉप मागे, तुलसी आय हॉस्पिटल जवळ, वृंदावन कॉलनी, द्वारका, नाशिक 422011 येथे करण्यात यावे.

ऑनलाईन सबमिशन गोदावरी आरती goda.arti@gmail.com वर पाठवावे.

तर गोदावरी निबंध रचना goda.essay@gmail.com वर पाठवावे. (PDF स्वरूपात नमूद केलेले ई-मेल आयडी वर पाठवण्यात यावे.)

निबंध व आरती पहिल्या पानावरती शाळा / कॉलेज/संस्थेचे नाव, वय, payment UTR no,whatsapp no आणि पत्ता नमूद करावा.

आरती, श्लोक, कडवे, आणि निबंधरचना स्वरचित असावी.

कोणतेही कॉपी केलेले साहित्य आढळल्यास ते स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार नाही. स्पर्धाचे मूल्यमापन हे त्या विषयावर असलेल्या सखोल ज्ञान, गंभीर विचार, भाषा कौशल्य क्षमतेवर आधारित असेल.

स्पर्धकांनी तारीख आणि सुसंगत पद्धतीने माहिती सादर करावी.

हे ही वाचा

जर एखाद्या व्यक्तीने कॉफी आणि चहा पिणे महिनाभर टाळल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात काही बदल दिसतील, ते कोणते ?

श्रीराम तीर्थ गोदावरी सेवा समिती नाशिककडील माहितीपत्रकातील हे नियम असतील.हे परिपत्रक नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना लागू असणार आहे.

Leave a Comment